जर्मन आख्यान भाग भाग ११, जर्मन सोशल बेनिफिट, भारतीयांना जर्मनीत संधी व बियर फेस्टिवल
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/15714 भाग १
http://www.misalpav.com/node/15729 भाग २
http://www.misalpav.com/node/15766 भाग ३
http://www.misalpav.com/node/15893 भाग ४
http://www.misalpav.com/node/15996 भाग ५
http://www.misalpav.com/node/16085 भाग ६
http://www.misalpav.com/node/16534 भाग ७
http://www.misalpav.com/node/16661 भाग ८
http://www.misalpav.com/node/17013 भाग ९
http://www.misalpav.com/node/19426 भाग १०
सध्या वास्तव्य म्युनिक शहरात आहे .येथे नुकताच जगप्रसिध्ध ऑक्टोबर फेस्टिवल साजरा करण्यात आला.
आम्ही हॉटेल व टुरिझम च्या व्यवसायात असल्याने भारतात शिकत असल्यापासून ह्या सोहळ्याविषयी खूप काही वाचून होतो.
जर्मनी आणी युरोप मध्ये म्युनिक म्हटले की ऑक्टोबर फेस्ट असे समीकरण आहे.
ह्या शहराविषयी माहिती मी देईनच .पण फेस्ट मधील मदहोश करणाऱ्या अनुभवावर आधारीत
.
माझा ऑक्टोबर फेस्टिवल ( बियर फेस्टिवल ) वर लेख इ सकाळ मध्ये आला आहे.
तोच येथे भाग ११ मधे अडकवत आहे.भूतलावरील सगळ्यात मोठा मानवी सोहळा असे ह्याचे वर्णन केले जाते.मदिरा आणी मदिराक्षी साठी हा फेस्ट प्रसिद्ध आहे.
जर्मनी मध्ये जर दीर्घकाळ वास्त्यव्यासाठी ( १ एका वर्षाहून जास्त ) जर येणे झाले .की येथे सरकारचा इंटिग्रेशन कोर्स करावा लागतो. ह्या कोर्स मध्ये बे१ म्हणजे ४ त्या लेवल पर्यत जर्मन भाषा आणी जर्मनीच्या आर्थिक,सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,व युरोपियन युनियन बद्दल माहिती शिकवली जाते.त्यावर सरकारतर्फे परीक्षा घेऊन त्यात उतीर्ण झालेल्या लोकांनाच येथे विसा वाढवून दिला जातो. आमच्या देशात राहणार असाल तर आमची भाषा व संस्कृती जाणून घेतलीच पाहिजे असा पवित्रा येथील सरकारने काही वर्षांपूर्वी घेतला. युरोपियन युनियन ची स्थापना झाली तेव्हापासून युरोपातील अग्रगण्य अर्थव्यवस्था असलेल्या जर्मन देशात नागरिकांना सर्वाधिक सोशल बेनिफिट दिले जातात .( ते देण्यासाठी प्रचंड प्रमाणात कर देखील आकारतात .) ह्यासाठी युनियन मध्ये नुकतेच सामील झालेले पूर्व युरोपातील विकसनशील देश तर आता त्यांच्या रांगेत स्वतःचे अवमूल्यन झालेले ग्रीस, पोर्तुगाल, इटली ह्या देशातील लोंढे जर्मनीत येत आहेत. ह्या मुळे जर्मनी मधील त्यांच्या सांस्कृतिक व सामाजिक
अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता .त्यांच्या ह्या समस्येत तुर्कस्थान ने मोलाची कामगिरी बजावली आहे.
१हिल्या व दुसर्या महायुद्धात सहकार्य केल्याबद्दल ह्या देशातील लोकांना दुसर्या महायुद्धानंतर
जर्मनी मध्ये विसा सुलभ रीत्या देण्यात आले . ( ह्या मागील खरे कारण देशच्या पुनर्विकासासाठी त्यांना स्वस्त व कष्टाळू मजूर हवे होते .इंग्लंड ने आफ्रिकेतील आपल्या वसाहती मधून उदा केनिया
भारतीय व आफ्रिकन लोक ह्याचं कारणांसाठी इंग्लंड मध्ये आणली .आजही आफ्रिकेतील काही देशातून भारतीय वंशाची व्यक्ती ( जिचे पूर्वज इंग्रजाकडून येथे आणले गेले ) ते इंग्लंड मध्ये कधीही येऊन स्थायिक होऊ शकतात. .त्यांना पासपोर्ट मिळू शक्ती हा कायदा आहे .मात्र श्रीलंकेत नेलेल्या तमिळ लोकांसाठी ही सवलत नाही ( हाच इंग्रजांचा उरफाटा कारभार )
तुर्की लोकांची तिसरी पिढी येथे नांदत आहे. पण राष्ट्राच्या मुख्य विचारधारेपासून त्यांनी स्वतःला जाणीवपुर्वक अलिप्त ठेवले आहे. येथे जन्मलेले अनेक तुर्की हे जर्मन पासपोर्ट धारक असतात .पण त्यांचे पाल्य त्यांना बालवयात तुर्कस्थानात आपल्या नातेवाईकात रहायला पाठवतात .( कमाल पाशाचा आधुनिक तुर्कस्थान कधीच इतिहास जमा झाला आहे. आता त्या जागी कट्टर धर्मांध पिढी निर्माण होत आहे .ह्याच कारणासाठी तुर्कीचे युरोपियन युनियन मध्ये पदार्पण खोळंबले आहे .) ही मुल तरुण झाली की लग्न करून जर्मनी मध्ये परत येतात .आल्यावर जर्मन भाषेचा शिक्षणाचा गंध नसला तरीही छोटी मोठी कायदेशीर व बेकायदेशीर अनेक काम करून आपल उदरनिर्वाह करतात. ह्यांचे सर्वात महत्वाचे काम प्रजोत्पादन असते., किंमान ३ ते ५ मुले हवीत ह्या कडे त्यांचा कटाक्ष असतो .( जर्मनी मध्ये दर महिन्यात पालकांना प्रत्येक मुलामागे २०० ते साडे तीनशे युरो संगोपनासाठी दिले जातात .) माझ्या परिचयातील एक तुर्की कुटुंब महिन्याला १००० युरो सरकार कडू घेते. येथे बेरोजगार भत्ता हे फारच रंजक प्रकरण आहे
.माझ्या परिचयातील एक जर्मन कुटुंब उच्च मध्यमवर्गीय मंदीच्या लाटेत बेरोजगार झाले. त्यांना सरकार कडून बेकार भत्ता त्यांच्या मूळ पगाराच्या ७० % वर्षभर मिळाला .त्यांच्या मुलांच्या खर्चाची बिले सरकारला दाखवून पैसे मिळू लागले. अनेक प्रकारची सवलतींची खिरापत त्यांना मिळाली. उदा जर्मनी मधील प्रवासात सवलत ....
ह्यामुळे किमान १ वर्ष तरी त्यांनी नोकरी शोधण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत .त्यांना दर महिन्याला सरकारला दाखवावे लागते की आम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत आहोत ह्यासाठी सरकार तर्फ्रे त्यांना नोकरीसाठी अनेक कार्यालयात पाठवले जाते. पण एखाद्या नोकरीत च्या मुलाखतीत रिजेक्ट कसे व्हायचे ( उदा लायकीपेक्षा जास्त वेतन मागणे ...) हे त्यांना अनुभवातून कळून आले .त्या जर्मन जोडप्यातील एका ने नामी शक्कल लढवली .सध्या आपण मंदीमुळे डिप्रेशन चे बळी झालो आहोत व आपल्यावर उपचार चालू आहेत .असे तो मुलाखतीच्या सुरवातीला सांगून मोकळा होतो.( वैद्यकीय सेवेचा खर्च विमा कंपनी देणार असल्याने व सध्या बेरोजगार असल्याने त्यांच्या हफ्त्याचा भार सरकार आपल्या खांद्यावर घेत असल्याने त्याने स्वतःची ट्रीटमेंट चालू केली .) त्यामुळे त्याला नोकरीत लगेच रिजेक्ट करतात व हि खुशखबर तो लगेच भ्रमण ध्वनी वर आपल्या पत्नीस देतो .अर्थात अशी कुटुंब जर्मनीत फारच कमी आहेत. पण नोकरी गेल्यावर दुसरी शोधण्यासाठी जीवापाड धडपड येथील नागरिक करत नाहीत हे देखील सत्य आहे. ह्याच साठी इटालियन व इतर प्रगत युरोप राष्ट्रातील कर्जबाजारी देशातील जनता त्यांच्या देशात कर्जामुळे हे सोशल बेनिफिट कमी केल्याबद्दल स्वतःच्या देशात आंदोलने करत आहेत
.( ह्याच मुळे युके मध्ये काही महिन्यापूर्वी दंगल उसळली, भले तत्कालीन कारण छोटेसे होते .) त्या जनतेपुढे सोपा उपाय जो बिहारी व युपी वाल्यापुढे असतो तोच आहे.
'' जर आपले राज्य ,सरकार आर्थिक विकास करत नसेन, आपल्याला रोजी रोटी देत नसेन तर युरोपियन युनियन च्या कायद्यानुसार ही लोक युनियन मधील २७ देशात कुठही बिना विसा जाऊन वास्तव्य करू शकतात'' .आता जर्मन सरकार पुढे पेच निर्माण झाला ह्या वाढीव लोंढे व त्यांचा खर्च ह्यांचे काय करावे .( अश्यावेळी भारत चीन व अमेरिका येथून येणारे उच्च शिक्षित मजूर जे महिन्याला १००० ते २००० युरो, कर म्हणून सरकारला देतात .मात्र पासपोर्ट धारक नसल्याने ह्या सोशल बेनिफिट पासून वंचित राहतात .त्यांचा प्रमुख आधार आहे.) विज्ञानात जगात अव्वल असणारे जर्मन राष्ट्राला आशियातील जपान व इतर राष्ट्राकडून संशोधन व इतर क्षेत्रात स्पर्धा करावी लागत आहे .ह्या क्षेत्रात अव्वल राहण्यासाठी जर्मन सरकारने अमेरिकेचे एच १ विसा धोरण व शिष्यवृत्ती च्या धाच्यावर आधारीत धोरण राबवले आहे.
तिसर्या जगातील हुशार व अनुभवी अभियंते ,वैद्यकीय पेशातील लोक, व पी एच डी साठी विसा नियम शिथिल केले असून प्रचंड सवलतींचा वर्षाव केला आहे. भारतातून अनेक तरुण ह्या व अनेक क्षेत्रात जर्मनीत सध्या येत आहेत .त्यापाठोपाठ लाल माकडे सुद्धा येत आहेत .आयटी क्षेत्र म्हणजे येथे भारतीयांची मक्तेदारी आहे .मला अनेक जर्मन, मी भारतीय आहे हे कळल्यावर आयटीत आहात का ? असा प्रश्न विचारतात.
.आपल्या लोकांचे ह्या शेत्रातील प्रभुत्व नक्कीच सुखावणारे आहे .आपल्या अनेक भारतीय आयटी कंपन्या येथे कार्यरत आहेत .पूर्व अविकसित जर्मनीत आयटी संस्कृती रुजवण्यात आपल्या देशी कंपन्यांचा सिंहाचा वाटा आहे. भारतातील जर्मन भाषा शिकवणारे अग्रगण्य संस्था गुटे अर्थात मैक्स मूलर भवन मध्ये मी जर्मन भाषेची मुळाक्षरे गिरवत होतो तेव्हा अभियांत्रिकी, शिक्षण नुकतेच संपवलेले किंवा शिकत असलेले किंवा सध्या नोकरी करत असलेली मूले येथे भाषा शिकत होते. एका वर्षाच्या आत ते जर्मनीत दाखल झाले .
आज गुटे मध्ये मुंबईत ( काळा घोडा ) येथे जर्मन भाषा शिकतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली .की येथील ८० % शिक्षक ,विद्यार्थी महाराष्ट्रीयन होते .
खुद्द जर्मन सरकार अनुदान देत असल्याने ह्या संस्थेत एक लेवल फक्त १२००० हजारात करता येते. उर्वरीत जगात दीड ते दोन लाख मोजावे लागतात . येथील संधींचा भारतीयांनी व माझ्या मराठी बांधवांनी फायदा करून घ्यावा जर्मनीत मराठी टक्का वाढवा असे मनापासून वाटते .म्हणून हा लेखणी प्रपंच .
ऑक्टोबर फेस्ट च्या लेखाची लिंक
.
वाचन
12384
प्रतिक्रिया
27