मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोडं - २

दिपोटी · · काथ्याकूट
दादा कोंडके यांच्या या धाग्यातील कोड्यामध्ये येथील काही जणांना असलेले स्वारस्य पाहून हे एक तसेच तर्कशास्त्रावर आधारलेले कोडे देण्याचा मोह आवरता येत नाही, तेव्हा हे घ्या : माझ्याकडे १२ नाणी आहेत, जी सर्व एकाच रंगाची-मापाची-आकाराची आहेत. यातील १ नाणे बनावट असून ते इतर ११ अस्सल नाण्यांपेक्षा वजनाने वेगळे आहे. मात्र हे १ बनावट नाणे इतर ११ अस्सल नाण्यांपेक्षा वजनात हलके आहे का भारी आहे याची माहिती आपल्याकडे नाही आहे. फक्त एक वजनाचा तराजू (पण वजनाच्या मापांशिवाय) दिला असता केवळ ३ वेळा तराजू वापरुन हे बनावट नाणे कोणते हे खात्रीपूर्वक कसे ओळखता येईल? - सोयीसाठी (म्हणजे प्रत्येक नाणे स्वतंत्रपणे ओळखता यावे म्हणून) सर्व १२ नाण्यांवर १ ते १२ अशा चढत्या भाजणीने क्रमांक दिला आहे. - तराजूच्या दोन्ही पारड्यांत नाणी टाकून तोलल्यास तो तराजूचा एकदा वापर झाला असे धरण्यात येईल. - तराजू digital नसल्यामुळे नाण्यांचे ग्रॅम्स् मध्ये वजन किती आहे हे कळण्यास मार्ग नाही आहे.

वाचन 10151 प्रतिक्रिया 53