मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

क्लिंटन · · जनातलं, मनातलं
नमस्कार मंडळी, आज गणेश चतुर्थी! आज आपलं लाडकं मिपा (तिथीने) चार वर्षाचं झालं. गेल्या चार वर्षात मिपावर अनेकविध विषयांवर दर्जेदार चर्चा वाचता आल्या, त्यात भागही घेता आला. तसेच मिपामुळे अनेक नव्या ओळखी झाल्या, मित्रपरिवार वाढला. आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे. असे हे उत्तम, दर्जेदार आणि सुंदर संकेतस्थळ चालू करून माझ्यासारख्या अनेकांना मायमराठीतून इतरांबरोबर संवाद साधायची संधी दिल्याबद्दल तात्या आणि नीलकांतचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तसेच स्वतःचा नोकरीव्यवसाय सांभाळून मिपासाठी संपादनाचे काम करत असलेल्या संपादकांचे आणि दर्जेदार विषय मिपावर आणून सगळ्यांना त्याचा आस्वाद घ्यायची संधी दिल्याबद्दल सर्वच मिपाकरांचे आभार. मिपाला आणि मिपाकरांना चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. (मिपाचा पहिल्या दिवसापासूनचा सभासद) क्लिंटन

वाचन 9715 प्रतिक्रिया 66