मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माळशेज सहलीसाठी सल्ला हवा आहे -

कौन्तेय · · काथ्याकूट
२४ - २५ सप्टें.चं माळशेज घाट एम टी डी सी चं आरक्षण केलंय. घरच्या गाडीने बायको, दोन मुलं नि बाबांसोबत जायचं आहे. २४ला शनिवार दुपार पावेतो खोलीत सामान घुसवणे, दुपार संध्याकाळ आजूबाजूला टीपी करणे; दुसऱ्या दिवशी २५ सप्टें.ला दिवसभरात शिवनेरी आदि पुण्यस्थळदर्शन नि २६ सप्टें.ला सकाळी सकाळी मुंबई प्रस्थान असा कार्यक्रम आहे. मुलं वयवर्षे अनुक्रमे ४ नि ८. डोंगर बिंगर चढायला अडचण नाय (जानेवारीत रायगड, कर्नाळा झालेलंय). माळशेज-अनुभवी मिपाकरांकडून पुढील सल्ल्याची प्रार्थना आहे - १. मपविम.च्या निवासस्थानाची एकूण व्यवस्था कशी आहे, जेवण इ. संबंधी काही टिपा. २. शनि. दुपार / संध्याकाळ मोकळीच आहे. एम टी डी सी निवासस्थानाच्या आजूबाजूला पायी फ़िरून आनंद घेण्यासारखे काही आहे का? वा गाडीने फ़िरून इतर काही? ३. रवि. २५ सप्टें.च्या पूर्ण दिवसात शिवनेरी सोबतच आणखी काही करता येईल का? ४. याउप्पर काही सल्ला असल्यास -

वाचन 11247 प्रतिक्रिया 47