मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्यादा आकाराचे पोस्ट कसे करावेत?

विनीत संखे · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी. मी गेल्या काही दिवसांपासून "करण आणि फ्रेण्ड्स" ही कथा जनातलं मनातलं मध्ये पोस्ट करतोय. जेव्हा मी सुरूवातीला पोस्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा मी ह्याचे "पूर्वार्ध" आणि "उत्तरार्ध" अशा दोन भागात मांडणी केली होती. पण नंतर कळले की मिपावर एक पोस्ट साठवताना काही शब्दमर्यादेपुढे सर्व्हर एरर देतो. वास्तविक ही सूचना "नवे ले़खन" पोस्ट करतानाच्या एडिटर वरच असायला हवी होती. कारण मिपाच्या एडिटरममध्ये तर सुरूवातीस माझी संपूर्ण कथा सुद्धा समावली होती. त्यामुळे मला वाटते की एका पोस्ट मध्ये कुठल्याही आकाराची कथा जाईल. पण तसे नाही आहे. त्यामुळे दोन वरून माझे पोस्ट बारा वर पोहोचले आणि अजूनही दहा बाकी आहेत. अनेक पोस्ट झाल्याने मला सांगण्यात आले की दोन भागांमध्ये वेळ जाऊ द्यावा. पण कथा रहस्यप्रधान आणि वेगवान मांडणीची असल्याने तिच्या दोन पोस्ट मधला वेळ तिची गती.घालवतो आणि वाचकाला सलग आस्वाद घेता येत नाही. कृपया मिपा संपादक मंडळींनी ह्या विनंतीकडे लक्ष द्यावे आणि एका पोस्ट मागे साठवण्यालायक आकार वाढवावा ही विनंती. आता मी गुगल डॉक्स वर संपूर्ण कथा टाकली आहे आणि त्याची लिंक दिली आहे. पण तसं केल्याने मिपावर संपूर्ण कथा टाकता न अल्याची खंत मला लागून राहिलच. धन्यवाद. --- विनीत संखे.

वाचन 2340 प्रतिक्रिया 10