कॉकटेल लाउंज : अनारीटा
मोहितो... । व्हिस्की गाथा... । लिक्युर गाथा... । व्हाइट रशिअन... । झणझणीत मरीआइ...
'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे अनारीटा
पार्श्वभूमी:
आज रविवार, मागच्या विकांताला काम केल्यामुळे आज सुट्टी आहे. पण श्रावण असल्यामुळे घरी काही अभक्ष भक्षण करता येणार नव्हते. बायकोचा आदेश आहे "श्रावणात बाहेर काय शेण खायचे ते खा, घरात ही थेरं चालणार नाहीत" (फक्त खाण्याबद्दलच हो, नाहीतर तुम्हाला वाटायचे मजा आहे सोक्याची, पण तेवढे भाग्य नाही हो :( )
हे कॉकटेल प्यायल्यानंतर बायकोच्या चेहेर्यावर आनंद आणि नवर्याच्या कलेबद्दल दुणावलेला आदर दिसला (फक्त क्षणभरच :() म्हणुन श्रावणात कॉकटेल न टाकण्याचा पण मोडुन हे कॉकटेल टंकायला घेतले :)
आज सुट्टी त्यात पावसाने वातावरणही मस्त कुंद झाले होते. मग वातावरण आणखीन 'रोमॅन्टीक' करण्यासाठी मस्त लेडिज स्पेशल कॉकटेल करायचे ठरवले. बायकोने ह्यावेळेच्या शॉपिंगमधे डाळिंब आणि डाळिंबाचा ज्युसही आणला होता. मग एक्दम अनारीटा आठवली. :)
टकीला बेस्ड जगप्रसिद्ध कॉकटेल मार्गरीटा ह्या कॉकटेलला डाळिंबाचा ट्विस्ट देउन बनवलेली रेसिपी म्हणजेच आजचे कॉकटेल, अनारीटा.
डाळिंबाचा, लालचुटुक रंग ह्या कॉकटेलला मस्त रंगीत छटा देतो आणि विशीष्ठ चव ह्या कॉकटेलला चवदार बनवते.
कॉइंत्रु: ही एक ऑरेंज लिक्युर आहे, उच्च दर्जाची ट्रिपल सेक.
प्रकार: टकीला बेस्ड, कंटेम्प्ररी कॉकटेल, लेडीज स्पेशल
साहित्य:
टकीला – 1.5 औस (45 मिली)
कॉइंत्रु – 0.5 औस (15 मिली) (दुसरा पर्याय ट्रिपल सेक)
डाळिंबाचा ज्युस – 2 औस (60 मिली)
लिंबाचा रस – 5 मिली
बर्फ
डाळिंबाचे दाणे – पाव डाळिंबाचे
ग्लास: – मार्गारीटा किंवा कॉकटेल
कृती:
कॉकटेल ग्लासमधे बर्फाचे खडे टाकुन त्यात पाणी घालुन ठेवा. ह्यामुळे ग्लास चिल्ड आणि फ्रॉस्टी होइल.
कॉकटेल शेकर मधे डाळिंबाचे 2 चमचे दाणे घेउन ते मडलर ने मडल(चेचुन) करुन घ्या.
मडल करुन झाल्यावर डाळिंबाचा रस सुटा होइल आणि एक छान फ्लेवर आणि अरोमा येइल कॉकटेलला
आता कॉकटेल शेकर बर्फाने अर्धा भरून घ्या. त्यात अनुक्रमे टकीला, कॉइंत्रु, डाळिंबाचा ज्युस आणि लिंबाचा रस टाकुन व्यवस्थित शेक करुन घ्या. शेकरवर बाहेरुन बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.
आता कॉकटेल ग्लासमधला बर्फ टाकुन द्या, ग्लास आता मस्त फ्रॉस्टी झाला आहे. त्यात आता 7-8 डाळिंबाचे दाणे टाका.
हे कॉकटेल बनवताना डाळिंबाचे दाणे मडल केले असल्यामुळे हे कॉकटेल 'डबल स्ट्रेन' (दोनदा गाळुन घेणे) करावे लागते. कॉकटेल शेकरच्या अंगच्याच स्ट्रेनर ने कॉकटेल मिक्सिंग ग्लास मधे गाळून घ्या. आता Hawthorne strainer वापरुन कॉकटेल ग्लास मधे गाळुन घ्या.
अनरीटा तयार आहे :)
नोट: सदर क़ॉकटेलची कल्पना 'द टल्लीहो बुक ऑफ क़ॉकटेल्स' वरून साभार.

वाचन
9284
प्रतिक्रिया
25