मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिच का देशभक्तांची किंमत??

चिंतामणी · · काथ्याकूट
आत्ताच ईसकाळवर एक बातमी वाचनात आली. "कॉंग्रेस संदेश' या मुखपत्राच्या ताज्या अंकात भगतसिंग व राजगुरू या क्रांतिवीरांना आदरांजली वाहताना त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आल्याने तो राजकीय वादाचा विषय ठरला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या तिघांनाही ब्रिटिशांनी 23 मार्च 1931 ला लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर लाहोरपासून 50 किलोमीटरवरील हुसेनवाला येथे त्यांच्या मृतदेहांचे गुपचूप दहनही केले. या ठिकाणी आजही स्मृतिस्तंभ आहे. लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव अनिल शास्त्री संपादक असलेल्या "कॉंग्रेस संदेश' या पाक्षिकाच्या ताज्या अंकात या तिघांनाही आदरांजली वाहताना, पंजाबातील लियालपूर येथे जन्मलेले भगतसिंग हे जाट शीख समाजाचे, तर पुण्यानजीक खेड येथे जन्मलेले राजगुरू हे देशस्थ ब्राह्मण समाजाचे होते, असा स्पष्ट उल्लेख छापण्यात आला आहे. सुखदेव (थापर) यांच्या जातीचा उल्लेख मात्र यात केलेला नाही. (सवीस्तर बातमी येथे वाचा) धर्म निरपेक्षतेचे धडे शिकवण्याची आपलीच लायकी आहे असे मानणारे नेते आता कुठे आहेत? असा आचरटपणा करायचे घैर्य येते कोठुन????

वाचन 6027 प्रतिक्रिया 31