मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्यांका कशा फसवतात?

विजुभाऊ · · काथ्याकूट
हल्ली बर्‍याच ब्यांका ग्राहकाभीमुख सोयी देत असतात. पण त्याचबरोबर त्या ग्राह्कांकडून काही चार्जेस देखील वसून करतात. बहुतेक सर्व ब्यांकांमध्ये कोअर ब्यांकींग असते. सर्व शाखा एका मध्यवर्ती सर्व्हरशी सलग्न असतात. या मुळे एखादी ठरावीक ब्रान्च वगैरे संकल्पनाना अर्थ रहात नाही. एटीएम मुळे तर तुम्ही कोणत्याही ब्यांकेच्या एटीएम मधुन पैसे काढू शकता पण त्याच वेळेस या ब्यांका पैसे भरण्यासाठी सरचार्ज लावतात. उदा: पुण्यातील एका शाखेतून पुण्याबाहेरच्या शाखेत कॅश भरायची आहे. ब्यांकेने यासाठी २५००० पर्यन्त रक्कमेसाठी १०० रुपये चार्ज लावला आहे. पासबुक स्टेटमेन्ट तुम्ही जर दुसर्‍या शाखेतून घेतले ( तुमचे ज्या शाखेत अकाउन्ट नाही अशा) तर त्यासाठी वेगवेगळे आकार लावले जातात. खात्यात मर्यादेपेक्षा कमी पैसे असतील तरीदेखील दंडम्हणून काही रक्कम कापून घेतात. ( मॅनेजरशी थोडी बोलाचाली केली तर हे चार्जेस माफही केले जातात) चेकबाउन्स होणे यासाठी . तुम्ही दिलेला चेक बाउन्स झाला तर तुम्हाला दम्ड होतोच शिवाय तुम्हाला दिला गेलेला चेक बाउन्स झाला तरीही तुम्हालाच दंड केला जातो सेविंग अकाउन्ट्स वर व्याज मिळते पण त्याची आकारणी कशी केली जाते हे कधीच सांगितले जात नाही. ऊ दा: महिन्याच्या शेवती शिल्लक असलेल्या रकमेवर्/अ‍ॅव्हरेज रकमेवर /एखाद्या विषिष्ठ तारखेस खात्यात असलेल्या रकमेवर ई.) डेबीट कार्ड क्रीडीट कार्ड बरेच दिवस वापरले नाही तर ते आपोआप रद्द होते. या बाबतचे नियम प्रत्येकब्यांकेच्या बाबतीत वेगळे असतात. क्रेडीट कार्ड देताना त्याची लिमीट साम्गितली जात नाही . तुम्हाला कर्ज देतेवेळेस ब्यांका कर्जाचा पहिला हप्ता परस्परच कापून घेतात आणि उरलेली रक्कम प्रत्यक्ष कर्ज म्हणून देतात. व्याज लावताना मात्र संपूर्ण रक्कमेवर लावतात. प्रत्येक ब्यांकेचे नियम वेगवेगळे असतील खाते उघडायच्या वेळेस ग्राहकाना त्याची माहिती ब्यांका देताना आढळत नाहीत. ब्यांकांच्या अशा नाडवणूकी चे अनेक किस्से असतील. तुमच्या बाबतीत काही घडले असतील तर लिहा. त्यामुळे इतरमिपाकर जागृत होतील. तसेच अशा फसवणूकी नन्तर दाद कोणाकडे मागायची हे कोणास माहीत असेल तर ते लिहा.

वाचन 28037 प्रतिक्रिया 0