तंदुरी चिकन
नमस्कार मंडळी,
उद्या रंणशिंग फुंकल जाणार. भारताचा सुपरबॉल चालु होतोय ना :D.
दोन चार दोस्त मंडळी नसतील सोबतीला तर काय मजा. म्हणुन मित्रांना आमंत्रण गेली आहेत. आमच्या तर्फे जय्यत तयारी केली जाणार आहे. फ्रिज भरलेला आहे. (कश्याने ते सांगायलाच हव का? ;))
बाकी सटर फटर तोंडी लावण्या सोबत तंदुरी केली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात त्याचा सराव सामना करुन झाला. तुम्हाला ही भारतासाठी जल्लोष करताना वातावरण निर्मीती करुन ठेवायची असेल तर मदत व्हावी म्हणुन हा प्रपंच. :)
तर लागा तयारीला फक्त २४ तास उरलेत. :)
साहित्यः
२ चमचे घट्ट दही (शक्यतो पाणी काढुन टाकलेल.)
२-३ मोठे चमचे तंदुर मसाला.
१-२ चमचे लाल तिखट.
१/४ चमचा केशरी रंग. (आवडत असल्यास.)
२ चमचे तेल.
१-२ चमचे आल-लसुण पेस्ट.
२ चमचे लिंबाचा रस.
मीठ चवी नुसार.
१ आख्खी कोंबडी. स्वछ धुवुन साफ केलेली.
कृती:
एका भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करुन घ्यावे.
कोंबडीला सुरीने चरे पाडुन वरील मिश्रण नीट चोळुन चोळुन लावावे. आणि कोंबडी फ्रिज मध्ये किमान १ तास मुरत ठेवावी.
ओव्हन २५० ते २७५ °C वर 15 मिनिटं तापवुन मग कोंबडी शिजत ठेवावी. २५-३० मिनिटांनी वरची बाजू खाली करुन परत २०-२५ मिनिटे शिजु द्यावं.
GO INDIA GO
वाचन
16913
प्रतिक्रिया
39