मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेवभाजी

शुभांगी कुलकर्णी · · पाककृती
नाशिक जळगाव भागाकडे अतिशय आवडीने खाल्ला जाणारा मसालेदार आणि झणझणीत पदार्थ १)सुकं खोबरे किसुन भाजुन १ वाटी २)कांदे २ मोठे (१ पातळ चिरुन भाजुन, दुसरा बारीक चिरुन) ३)एक लाल टोमॅटो चिरुन ४)धणे १ मोठा चमचा भाजुन ५)४ लवंगा, छोटा दालचिनिचा तुकडा भाजुन ६)लसुण पाकळ्या ८-१० ७)१ छोटा चमचा तीळ भाजुन ८)लाल तिखट १ +१/२ चमचा छोटा ९)गरम मसाला १ चमचा छोटा (कांदा लसुण मसालाही वापरु शकता खमंग हवेतर) १०)१ छोटा चमचा हळद आवडत असेल तर मी टाकत नाही ११)मीठ चवीनुसार १२)कोथिंबीर अर्धी वाटी धुवुन बारीक चिरुन १३)फोडणीच साहित्य १४)तेल २ चमचे १५) गरम पाणी आणि १६)जाडी शेव (काका हलवाईची एकदम छान असते) फरसाणच्या दुकानात मिळते क्रमवार पाककृती: प्रथम धणे, तीळ, सुक खोबर, लवंग, दालचिनी मिक्सीवर बारीक वाटुन घ्या. त्यात भाजलेला कांदा, टोमॅटो घालुन परत फिरवा. कढईत तेल तापल्यावर मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर बारिक चिरलेला कांदा गुलाबीसर परता त्यात चिमुट्भर साखर व लाल तिखट टाका (फोडणीत साखर व लाल तिखट टाकल्याने कटावर चांगला तवंग्/तर्री येते) आता वाटलेला मसाला घालुन तेल सुटेपर्यंत परता. मसाला चांगला परतल्यावर त्यात गरम मसाला, मीठ, हळद (ऑप्शनल) घालुन आधणाचे पाणी घाला. उकळी आल्यावर त्यात थोडी शेव घालुन झाकुन ठेवा. वाढायच्या आधी कोथिंबीर टाकुन वाढा. एकंदरीत पदार्थ असा दिसतो Image removed. आणि हे वाढल्यावर सोबत कांदा, लिंबु असेल तर मजाच न्यारी. Image removed. वाढणी/प्रमाण: हवे तसे अधिक टिपा: एकदम शेव टाकु नये गचका होतो (पिठल होण्याची शक्यता जास्त) शेव जाडीच वापरावी. माहितीचा स्रोत: ढाब्यावरच्या पदार्थाचे निरीक्षण आणि कितीतरी अयशस्वी प्रयोग

वाचन 8044 प्रतिक्रिया 20