मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सेल मांडीयेला

अरुण मनोहर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सेल मांडीयेला सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे विचार विवेक,................गेला पालटूनी विचार विवेक,................गेला पालटूनी एकमेका सांगतील घेई रे सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे..........................|धृ| होतो गाजा फार,................खर्चती तत्पर कापले पार ह्यांचे खिसे रे फुका गेती माल,.................पडला बेकार फुका गेती माल,.................पडला बेकार गीफ्टला समजुनी फ्री जणू रे सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे..........................|धृ| गरज आवशकता,.................विसरुनी जाती सेल पहाता ढीगाने घेती खिसा खाली होता,.................कार्ड परजती खिसा खाली होता,.................कार्ड परजती प्लास्टीकला पाझर फुटती रे सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे..........................|धृ| दिवाळीचा सेल,.................नववर्षी सेल सेल फेकतो मायाजाल रे ओपनींग सेल,..................क्लोजींगलाही सेल ओपनींग सेल,..................क्लोजींगलाही सेल क्लोज करवितो क्रेडीट अकौन्ट रे सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे विचार विवेक,................गेला पालटूनी विचार विवेक,................गेला पालटूनी एकमेका सांगतील घेई रे सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे

वाचन 4879 प्रतिक्रिया 14