मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खतखते

प्रभाकर पेठकर · · पाककृती
साहित्यः बटाटे - ४ (मध्यम आकाराचे) मक्याची कोवळी कणसे - ४ लाल भोपळा - १/४ किलो सुरण - १/४ किलो लहान वांगी - ४ दोडकी - २ गवार - १२५ ग्रॅम्स तुरीची डाळ - १ वाटी चिंच-गुळाचा घट्ट कोळ - अर्धी वाटी ओले खोबरे - दिड वाटी लाल तिखट - १ टीस्पून हळद - अर्धा टी स्पून तिरफळे - १२ खोबरेल तेल - फोडणीसाठी हिंग आणि मोहरी - फोडणीसाठी मीठ - चवीनुसार तयारी: भाज्यांचे मोठे तुकडे करा. बटाटा, भोपळा सालासकटच घ्यायचा. गवार आख्खी ठेवायची. तुरीची डाळ, थोडी हळद घालून, शिजवून, घोटून घ्यायची. खोबरे + हळद + तिखट एकत्र वाटून घ्यावे. तिरफळे पाण्यात भिजत ठेवायची. कृती: सर्व भाज्या थोडे मीठ आणि बेताचे पाणी घालून शिजत ठेवायच्या. भाज्या शिजल्या की त्यात तुरीची डाळ, खोबर्‍याचे वाटण, चिंच गुळाचा कोळ आणि तिरफळे घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. वरून हिंग मोहरी घालून खोबरेल तेलाची फोडणी द्यायची. खोबरेल तेल आवडत नसेल तर गोडेतेल सुद्धा चालेल. शुभेच्छा....!

वाचन 51695 प्रतिक्रिया 78