मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृत आणि संगणक

नितिन थत्ते · · काथ्याकूट
भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे वारंवार जालावर फिरत असतात त्यांत "संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे" असे एक विधान असते. बहुधा हे विधान परम संगणकावर काम केलेले डॉ विजय भटकर यांच्या नावे दिलेले असते. भटकर यांनी असे विधान केले असेल तर ते काय आधारावर केले असावे? त्यांचे विधान योग्य असेल तर सध्या जगात कोणी ना कोणी संस्कृत भाषा वापरून संगणकाचे प्रोग्रॅमिंग करण्याचा प्रयत्न करीत असणार. त्याबाबत काही माहिती आहे का? स्वतः भटकर तसे काही काम करीत आहेत का? भटकर यांनी असे विधान केले नसेल तर ते असेच ठोकून दिलेले विधान आहे असे म्हणावे का? येथे संगणक, प्रोग्रॅमिंग क्षेत्रात काम करणारी खूप मंडळी आहेत. त्यांना काही माहिती असली तर त्याबद्दल प्रतिसादातून लिहावे.

वाचन 20705 प्रतिक्रिया 41