मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिअर गर्ल्सचा खेळामधे वापर किती योग्य अथवा अयोग्य/ आवश्यक अथवा अनावश्यक?

अनामिका · · काथ्याकूट
सध्या आय पी एल ने भरवलेल्या २० षटकांच्या चेंडुफळीच्या सामन्यांत प्रत्येक षटकार आणि चौकारावर तसेच संघाने मिळावलेल्या खेळाडुंच्या बळींवर अंगप्रदर्शन करत नाचणार्‍या चिअर गर्ल्सची खरच कुठ्ल्याही खेळामधे निदान भारतात तरी गरज आहे का? नाही !असे निदान माझे तरी मत . खेळाडुंची खरेदी विक्री देखिल गैरच ,पण निदान त्यामधे अगदी हालाखीच्या परिस्थितितुन आलेल्या गुणी खेळाडुंना आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यास हातभार लागतो आहे हीच काय ती जमेची बाजु. पण खेळाडु व प्रेक्षकांचा उत्साह वाढविण्याच्या नावाखाली तो़कड्या कपड्यात नाचुन (थैमान घालुन) पुर्ण क्रिडांगण डोक्यावर घेणार्‍या चिअर गर्ल्सचा खेळामधिल वापर खरच अनावश्यक वाटतो .भारतासारख्या वैविध्यपुर्ण देशात अश्या प्रकारच्या गोष्टींना थारा देणे कितपत आणि कुठल्या नैतिकतेच्या कक्षेत बसते ? भारतासारख्या बहुभाषिय व बहुप्रांतिय देशात अनेक नृत्य प्रकार अस्तित्वात आहेत्.त्याचा देखिल वापर आयपीएलला त्यांनी दिलेल्या तथाकथित कारणांसाठी करणे शक्य होते.पण आपल्या असलेल्या संस्कृतीचा अभिमान न बाळगता ,विदेशी संस्कृतीचा अवलंब करणे अतिशय निंदनिय नव्हे काय? अनामिका"

वाचन 12247 प्रतिक्रिया 31