मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनम्र आवाहन..

मिसळपाव पंचायत समिती · · काथ्याकूट
राम राम मंडळी, येथील सभासदत्व घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. आम्ही आपणा सर्वांचे मिसळपाव या आपल्या संकेतस्थळावर हार्दिक स्वागत करत आहोत. या संकेतस्थ़ळाच्या मांडणीबद्दल, येथील सोयींबद्दल, त्रुटींबदल आपण इथे अवश्य लिहावे ही विनंती! हे संकेतस्थळ नव्यानेच स्थापन झालेले असून इथे काही तांत्रिक त्रुटी शिल्लक राहिल्या आहेत याची आम्हाला जाणीव आहे. तरी कृपया त्या त्रुटी आपण या काथ्याकुटात दाखवून द्याव्यात व शक्य असल्यास काही उपायही सुचवावेत ही नम्र विनंती. आपण दाखवून दिलेल्या त्रुटींवर आमच्या परिने लवकरात लवकर उपाय शोधण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू! कळावे, आपले नम्र, मिसळपाव पंचायत समिती, मिसळपाव ग्रामपंचायत.

वाचन 68903 प्रतिक्रिया 60