मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चॉकलेट चिप मूस

स्वाती२ · · पाककृती
चॉकलेट चिप मूस Image removed. साहित्य १ कप सेमी-स्वीट चॉकलेट चिप १ पाकिट(८ औस) क्रिम चीज मऊ केलेले १ टी स्पून वॅनिला १ डबा(८ औस) फ्रोझन व्हिप्ड टॉपिंग, थॉ करुन शोभेसाठी पाकातल्या चेरी Image removed.Image removed. मायक्रोवेव मधे चॉकलेट चिप्स वितळवून घ्या. २-३ मिनिटात चिप्स वितळतात. चमच्याने ढवळून एकजीव करून बाजूला ठेवा. एका बोल मधे क्रिम चीज आणि वॅनिला फेटून घ्या. तो पर्यंत चॉकलेट गार झाले असेल. वितळलेले चॉकलेट क्रिम चीज मधे घालून फेटा. आता त्यात व्हिप्ड टॉपिंग हलक्या हाताने फोल्ड करा. बोल मधे घालून सर्व करेपर्यंत फ्रीज मधे ठेवा. सर्व करताना वर चेरी लावा.

वाचन 4730 प्रतिक्रिया 11