<पुन्हा ती भेटली तेव्हा.>
गतकाळातले प्रियकर- प्रेयसी अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटतात.. ही कवितेची थीम आहे.
अगा गा गा गा गा गा गा गा बो बो बो बो बो अशा चालीत वाचावे.)
==============
दिसलीस तू.. भेटलीस तू..
थांबल्या रीक्षा, थांबल्या बशा ( बस चे अनेकवचन)
थांबला जणू रस्ता तेवढा
जाम ट्रॅफीक .. थांबवलीस तू !
भासलीस तू कापरापरी,
काजळी जणू.. काळजावरी
लखलखती भिंगे ढापणी
सांगती तुझी बातमी खरी
न स्मित मोजके, न बोलणे कमी
नको त्याच चौकश्या, नको त्या बातम्या..
जे मनात ते, बोललो कुठे?
होत राहिले हेच नेहमी..
ढोसणे तुझे.. खुंदणे तुझे..
आळसावणे.. डुलकणे तुझे..
त्या कळा कुठे? बेरंग ते कुठे?
लोपले कुठे.. पेंगणे तुझे?
शब्द का मुके? मौन बोलके..?
तोंड दाबूनी जरा, बोल नेमके
सांग कल्पना, सांग शक्यता
दे वेदना.. आण हुंदके!
कळे ना मला , तू टोचते कुठे?
काय वाटते? तू बोचते कुठे?
शिजवतेस तू त्या तटावरी..
या तटावरी पचते कुठे?
तीच तू जरी.. तोच मी जरी
वेगळे किती वाटतो तरी !
एवढी कशी वाढली वजने?
वाढली कधी, सांग ही ढेरी?
मोकळी कधी ही व्हायची
ट्रॅफीक ती वाहनांची ?
हॉर्न वाजले.. पो पॉ टीर्र ठ्रँ
वेळ जाहली..तू सूटायची
.
.
.
काय घेतले? काय मी दिले?
वय वाढले? दोंद सुटले ?
म्हणतो आता एवढेच
बरे जाहले.. नाही जमले ते
बरे जाहले जे जाहले ते
( मी सूटलो ना एका अवजड जबाबदारीतून ........ आगागागागागागागागा )
वाचन
2863
प्रतिक्रिया
0