बटाट्याची भाजी
३-४ बटाट्याचे उभे गोल गोल काप करुन घेणे.साले काढू नयेत.
त्यात ४-५ हिरव्या मिर्च्या कापून ,(तिखट हवे असल्यास २ मिरच्या जास्त घेणे )
३-४ मोठे चमचे ओले खोबरे खवून ,
२-३ चमचे लाल तिखट ,
१/२ चमचा हळद ,
८-१० कळ्या लसूण ठेचून,
२-३ काड्या कोथिंबीर चिरून,
चवी प्रमाणे मीठ,
२ मोठ्या पळ्या तेल
वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत व
भांडे गॅस वर ठेवावे . गॅस मंद ठेवावा.
२-३ मिनीटानी वाफ आली की एक वाटी पाणी घालून भाजी शिजू द्यावी .
( रस्सा हवा असल्यास पाणी थोडे जास्त घालावे )
गरम गरम चपाती बरोबर खावी.
वाचन
14455
प्रतिक्रिया
31