मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्पिन अ यार्न

विजुभाऊ · · काथ्याकूट
स्पिन अ यार्न हा ईंग्लीश मधला धमाल प्रकार आहे.यात एक कथा सूत्र घेतले जाते आणि वेगळे वेगळे लोक त्या कथेत स्वतः रंग भरतात्.सूत्रधार कथेला मार्गावर आणण्याचे काम करत असतो......( एकता कपूर असेच करत असावी) मला वाटते यात धमाल्या. सगळे डॉन , डांबीस काका प्राजु तात्या वरदा सगळे विवेक इनोबा सगळे डॉ. सर्वाना जोरदार वाव आहे..आपण्ही असा एखादा प्रयोग करुया.पुणेरी,कोल्हापुरी,मालवणी ,गोयची कोकणी ,वैदर्भी ,नागपुरी भाषेची मस्त मिसळ चालेल चला रेडी का? करू सुरुवात? तर कथा सूत्र असे ठेवायचे आहे की........... एक चाळ आहे त्यात रहाणारे पोंबुरकर यांचा मुलगा मोहीत आणि कळस्कर यांची कन्या यांचे सूत जुळले आहे घरी सांगितल्यावर चाळीत थोडासा दंगा होतो.घरची मंडळी तयार होतात्.लग्न थाटात झाले पहीजे या अटीवर. चाळकरी लग्न थाटात करण्याचा घाट घालतात....( पुढचे कसे ते वेळ आल्यावर सांगतो) तर मंडली करुया सुरुवात" स्पिन अ यार्न" ला................................ अरे तो पोंबुर्कर काय म्हणतो ते मला माहीत आहे. चाळीत थाटात लग्न काय झाली नाहीत? हजार जेवण झाले पहीजे म्हणतो...याच्या स्व:च्या ओळ्खीची हजार काय पन्नास माणसे तरी असतील का?.............दोन्ही घरातले पाहुणे धरले तरी वीसावर पान जात नाही.. याच्या आज्या ने लग्नात हजार पान जेवु घातले म्हणतो. बाबा कळस्कर गर्जत होते. चाळीच्या दहा घरात तरी त्यांच आवज पोचत असेल. मुलीने परस्पर लग्न ठरवले याचे त्याना थोडे अश्चर्य थोडासा धक्काअणि थोडसा आनंद असे संमिश्र काहीतरी वाटात होते. माला बाईना मुलगी डोळ्यासमोर रहाणार याचे बरे ही वाटत होते आणि त्याच वेळेस मुलगी चाळीतच रहाणार याचे वाईट ही वाटत होते.

वाचन 15333 प्रतिक्रिया 0