मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिपिन कार्यकर्त्यांना संपादक पदावर बढती..!

विसोबा खेचर · · काथ्याकूट
राम राम मायबाप मिपाकरहो, मिपाच्या संपादक मंडळात काही बदल करण्यात आलेले आहेत. प्रियाली आणि मृदुला यांना हल्ली कामाच्या व्यग्रतेमुळे संपादक पदाला पुरेसा न्याय देता येत नाही. प्रियाली यांनी यापूर्वीच तसे सांगितले होते. असो.. आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मिपाचे एक सन्माननीय सदस्य, हितचिंतक आणि आमचे मित्र बिपिन कार्यकर्ते यांना मिपाचे संपादक पद बहाल करण्यात आलेले आहे. मिपाचे हसतेखेळते, थट्टामस्करीचे, टोप्या-टपल्यांचे वातावरण तसेच कायम ठेऊन ते ही संपादक पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतील असा आमचा विश्वास आहे. आज दिनांक १ जुलै रोजीचे संपादक मंडळ खालीलप्रमाणे. मिपावर वावरतांना, लेखन करतांना, कुणालाही काही अडचण आल्यास या पैकी कुणा एका संपादकाशी खरडी अथवा व्य नि द्वारा संपर्क साधावा अथवा आम्हाला लिहावे. १) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!) २) चतुरंग (संपादक + विशेष अतिरिक्त भार - काव्य व कलादालन, फौजदारी - रात्रीची गस्त) ३) मुक्तसुनीत (संपादक + विशेष अतिरिक्त भार - साहित्य, काव्य विभाग) ४) बिपिन कार्यकर्ते (संपादक + विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण, फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्‍या, हेवेदावे) ६) नीलकांत (संपादक + तंत्रविभाग प्रमुख) ७) विकास (संपादक + विशेष अतिरिक्त भार - राजकीय व वैचारिक लेख/काथ्याकूट) ८) प्राजू (संपादक + विशेष अतिरिक्त भार -काव्य विभाग) ९) चित्रा (संपादक + विशेष अतिरिक्त भार - फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्‍या, हेवेदावे) १०) नंदन (संपादक + विशेष अतिरिक्त भार -साहित्य विभाग, पाककृती ) वरील सर्व संपादक आपल्या व्यस्त दैनंदिन कामकाजातून वेळात वेळ काढून मिपा स्म्पादक पदाची जिम्मेदारी सांभाळतात त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे... आपला, तात्या अभ्यंकर, मालक, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.

वाचन 24335 प्रतिक्रिया 75