काळा
तुम्ही काहीही म्हणा, कोणत्याहि काळातील उदाहरण घ्या दोन रंगांनी मानवी समाजजीवनात एक विषेश स्थान पटकावले आहे. मानवी भावविश्व, अर्थविश्व, राजकारण, समाजकारण, काव्य, प्रतिभा अश्या नानाविध ठिकाणी या रंगानी आपला ठसा मानवाच्या आयुष्यात उमटवला आहे. तुम्ही ओळखलंच असेल हे रंग म्हणजे काळा आणि पांढरा
अश्मयुगातही प्रमुखाच्या गुहेला सफेद चुन्याची चित्रे काढल्याचे दिसुन येते......
देवाला सगळ्या रंगांची फुले वाहता येतात पण काळी फुले तुम्ही देवाला वाहाल का? ........
"स्वच्छता" म्हटली की डोळ्यांसमोर येते ती "शुभ्रता", आणि "काळा" रंग हा घाण/कचरा दाखवायलाच वापरतात.
माणसाचा चेहेरा आनंदाने "उजळतो", तर तो दु:खाने "काळवंडतो"... एखाद्याला हाकलतानाही "तोंड काळं कर" म्हणलं जातं....."काळा हिरा"ही म्हणायपुरताच
सफेद, पांढरा हा नेहेमीच स्वातंत्र्य, पावित्र्य, बंधुता दाखवत आला आहे तर काळा रंग दानवी कृत्य, वाईटपणा, तुच्छता झेलत आला आहे
थोडक्यात माणसाने अनादी काळापासूनच पांढर्या रंगाला काळ्यापेक्षा श्रेष्ठ वागणूक दिली
पुढे माणसाने हा रंग वर्णात-त्वचेत शोधायला सुरवात केली. गोर्या त्वचेच्या माणसांनी पृथ्वी व्यापली आणि जेत्या गोर्या त्वचेला भाव आला, नैतिकता आली आणि काळा हा काळाच राहिला.
२०व्या शतकात काहि माणसांची मानसिकता बदलली. आता उघड उघड तरी वर्णभेद दाखवला जात नाहि. बर्याच नेत्यांनी जगाला गोर्यांच्या काळ्या मानसिकतेतुन सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न केला. ("इथे ही "काळा" रंग मात्र कमी दर्जाचे मन याच अर्थी वापरला गेला). त्वचेचा रंग काळा असला तरी मनाने गोरे आहोत असे म्हणून काळ्या रंगाला अजूनच तुच्छ लेखले गेले
अजुनही ही मानसिकता दिसते. भारतीय लावणी नर्तकीला केवळ एका व्हिजासाठी नृत्य करायला लावले जाते.... "काळ्या-तपकीरी" कातडीच्या खेळाडूंवर शेरेबाजी होते... अजुनहि युरोपातहि वांशिक चकमकी होतात.. तशी हि यादि न संपणारी आहे.. पण हल्लीचं उदा. द्यायचच "ब्लॅक" नाव असलेल्या चित्रपटाला साधं ऑस्कर नॉमिनेशनसाठी नाकारलं जातं हे काय कमी आहे? ;)
श्रेयअव्हेर (डिस्क्लेमर):
वरील लिखाण हे केवळ एक "उबळ" या स्वरुपाचे असे स्वैर लिखाण असून ते लिहिताना कोणत्याहि सत्यासत्यतेची पडताळणी केलेली नाहि तरी अश्या लिखाणास फार सिरियसली(मराठी?) न घेता ह घ्या हेवेसांनल
उबळीची प्रेरणा: ही चर्चा