एक व्य नि..!
राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो,
आत्ताच ऑनलाईन आलो. नेहमीप्रमाणेच मिपाबद्दल काहीना काही सूचना करणारे, कंप्लेन्टी करंणारे, एकमेकांबद्दल तक्रारी करणारे दोन-पाच व्य नि आले होते. परंतु त्यातील एक व्य नि मला खूप सुखावणारा होता, आनंद देणारा होता. त्या व्य नि तील जो मजकूर होता त्याचे श्रेय अर्थातच मिपाचे आणि मिपाकरांचे! :)
आपल्याही सर्वांना त्या व्य नि तील मजकूर निश्चित आनंद देऊन जाईल या हेतूने तो व्य नि मी येथे देत आहे. व्य नि पाठवणार्या व्यक्तिचे नाव उघड करणे अर्थातच उचित होणार नाही. त्याचप्रमाणे व्य नि तील काही मजकूरदेखील मी संपादित करत आहे जेणेकरून व्य नि पाठवणार्या व्यक्तिचे नाव जाहीर होणार नाही.
माझ्या मते व्य नि कुणी पाठवला हा मुद्दा गौण आहे. परंतु त्यातील मजकूर मात्र सर्वांना आनंद देऊन जाईल अशी खात्री वाटते! :)
व्य नि चा मजकूर खाली निळ्या अक्षरात देत आहे. मी केलेले संपादन ठळक अक्षरात देत आहे -
प्रिय तात्यास,
सप्रेम नमस्कार,
मी योगायोगानेच मिपावर आलो.मिपावरील अस॑ख्य सिध्दहस्त लेखका॑च्या प्रेरणेने मीही मिपावर लेखन करावयास लागलो.
ति ते लेखन चोरुन वाचत असे, त्यामुळे माझ्या खर्या प्रेमाची साक्ष तिला पटली.तिचा आणी माझाही "ईगो" गळुन पडला.
आज तिने फोन केला आम्ही दोघे आज पुन्हा एक झालो.
हे आपले आणी आपल्या मिपाचे माझ्यावर अ॑नत ऊपकार आहेत.
खरोखरच आपल्याला कोटी-कोटी धन्यवाद.....
मी आपला ऋणी आहे,आपल्या ऊपकाराची मी कधीही आपणास कधीही परतफेड करू शकत नाही.पण मी आपल्या कधीही काहीही कामी पडलो तर स्वतला भाग्यवान समजेन.
तानपुर्याच्या तारा आता नव्याने जुळल्या आहेत असं वाटतं! त्या आता अशाच सुरेल झंकारत राहोत हीच शुभेच्छा! :)
आपला,
(कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.
वाचन
11399
प्रतिक्रिया
43