आजही श्वासात आहे.. लागतो काही सुगावा
लेखनविषय:
आमची प्रेरणा प्रसन्न शेंबेकर यांची सुरेख रचना पाहतो श्वासात कोठे.. लागतो काही सुगावा
आजही श्वासात आहे लागतो काही सुगावा
काल तू होतीस प्याली सांगतो आहे पुरावा
अंगणापर्यंत आता वारुणीचा वास जातो
काल मी बहुतेक गेलो ह्याच वाटेने असावा?
ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का?
"सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा
ती म्हणाली "माग ना रे... तू, मला सोडून काही"
(ग्लास तू भरशील तेव्हा चेहरा माझा दिसावा! )
काय अंधारून आले माझिया डोळ्यांसभोती
भास नाही रे तुझा तो पेग पतियाळी असावा
लागले थोडे जळाया यातना झाल्या मला ही
पायलो मी काल ज्याला, ब्रँड तो माझा नसावा
वाटते काही कवींना एकदा हे ही घडावे
एकदा "केश्या"स या पण चांगला कोणी धुवावा
वाचन
4545
प्रतिक्रिया
19