मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाव (ब्रेड)

दिपाली पाटिल · · पाककृती
साहित्यः ७ कप मैदा ७ ग्रॅम यिस्ट १ मोठा चमचा साखर ३.५ कप कोमट पाणी ७ लहान चमचे वितळवलेले बटर चवी नुसार मिठ १ कप दुध किंवा १ अंडं कृती: १) एका वाडग्या त पाणी घेऊन त्यात साखर + यिस्ट एकत्र करून घ्यावे. या मिश्रणा ला ५-१० मिनटं ठेवा. नंतर मिठ पण मिसळुन घ्यावे. २) एका ताटा त किंवा मोठ्या भांड्या त मैदा घेऊन त्यात वरील मिश्रण टाकून एकत्र करावे व नीट मळून घ्यावे. ३) या मिश्रणा त वितळवलेले बटर टाकुन नीट मळून घ्यावे. नीट पंच करावे. साधारण पणे १०-१५ मि. ४) हे मिश्रण झाकून उबदार जागेवर १ तास ठेवून द्या, हे दुप्पट फुगुन येते. ५)एका तासा ने परत या मिश्रणा ला बाहेर काढून ४-५ पंच मारावे. ६) आता या मिश्रणा चे गोळे करुन greased कुकी ट्रे वर ठेवावे. २०-२१ गोळे होतात. ७) या गोळ्यां ना परत १/२ तास उबदार जागेवर ठेवावे. हे पुन्हा दुप्पट फुगुन येतात. ८) ओव्हन ३७५ फॅ. वर गरम करुन घ्या. ९) या वेळा त गोळ्यां वरुन दुध किंवा फेटलेले अंडे (egg wash)लावावे. १०) ओव्हन मधे ३७५ फॅ. वर २०-२५ मि. सगळ्या त वरच्या रॅक मधे बेक करुन घ्या. ११) बाहेर काढल्या वर बटर स्टिक किंवा तुप लावावे.

वाचन 15892 प्रतिक्रिया 33