मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साकिया (३) - "टकिला सनराईज"

नाटक्या · · पाककृती
या आधीचे लेखः साकिया - पुर्वतयारी साकिया (१) ... साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम" ========================================================== टकिला सनराईज या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "टकिला सनराईज" (Tequila Sunrise) साहित्य: - २ औंस टकिला - १ चमचा ग्रेनाडाईन (याची कृती दिलेली आहे) - ३ औंस संत्र्याचा रस - लिंबाचे आणि संत्र्याचे पातळ काप (सजावटी साठी) - बर्फ कृती: प्रथम आपण ग्रेनाडाईन बनवण्याची कृती बघुया: ग्रेनाडाईन हे डाळींबापासून बनवलेले सिरप आहे. या साठी तुम्हाला ४ डाळींब लागतील. प्रथम डाळींब साफ करून त्याच्या बिया मिक्सरमध्ये घालून १०-१२ मिनिटे ग्राईंड करून घ्या (रस काढण्यासाठी) नंतर ते वस्त्रगाळ करून फक्त ताजा रस एका पातेल्यात काढून घ्या. त्यात १/४ कप मध घालून चांगला ढवळा आणि मंद आचेवर जेमतेम उकळी फुटे पर्यंत तापवा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा. साधारणतः २ कप ग्रेनाडाईन तयार होईल. वापरून झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. अमेरिकेत (किंवा इतरत्र परदेशात) ग्रेनाडाईन तयार मिळते. त्यात पदार्थ टिकवण्यासाठी आवश्यक असे काही रासायनिक द्रव्य टाकल्यामुळे खराब होत नाही, तेव्हा ते फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. आता मुख्य कृती बघुया: शेकर मध्ये मध्ये २-३ बर्फाचे खडे घ्या त्यात टकिला आणि ग्रेनाडाईन टाका. शेकरचे झाकण घट्ट बंद करून १५-२० सेकंद हलवून घ्या. शेकरमध्ये तयार झालेले द्रावण ५-६ बर्फाचे खडे असलेल्या ग्लासमध्ये ओता. आता संत्र्याचा रस अलगदपणे ग्लासमध्ये सोडा. लिंबाची आणि संत्र्याची काप सजावटी साठी वरुन ग्लासमध्ये टाका.
तुमचे कॉकटेल तयार आहे (सजावटी सकट). डिस्क्लेमरः १. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत. २. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे. धन्यवाद... - नाटक्या

वाचन 9888 प्रतिक्रिया 16