मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संततीसंबंधी समस्या -- बीज क्षेत्र विचार

धोंडोपंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लोकहो, संतती न होण्याचे समाजातील प्रमाण मोठे आहे. आणि गेल्या काही वर्षात विविध कारणांनी ते वाढले आहे. याचे एक कारण म्हणजे प्रेमविवाहाचे वाढते प्रमाण. प्रेमविवाहात जोडिदारांच्या पत्रिका जुळत आहेत की नाही हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित होतो. आणि त्यानंतर त्याचे दुष्परिणाम संतती न होणे, संतती होऊन जाणे, वारंवार गर्भपात होणे, त्यातून येणारे नैराश्य, जोडीदारांचे एकमेकांशी न पटणे, "तुझ्यामुळे माझे आयुष्य बरबाद झाले" अशा स्वरूपाचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप, आणि त्याची परिणती म्हणजे घटस्फोट आणि विभक्तता. त्याचप्रमाणे काहीजणांच्या कुंडलीत मुळातचं संततीसौख्य नसतं. त्यांना अनेक ट्रिटमेंट घेऊनही आणि विविध डॉक्टरांकडे जाऊनही संतानप्राप्ती होत नाही. मुळात जर कुंडलीमध्ये काय आहे, हे जाणून घेतले तर वरील गोष्टींपासून आपोआप वाचता येतं. जर का दोघांपैकी एकाच्या कुंडलीत "वंध्यायोग" असेल( बीज-क्षेत्र अत्यंत कमकुवत ज्यामुळे गर्भधारणा होऊच शकत नाही), "मृतवंध्या" योग असेल ( मूल होऊन ते जाणे किंवा मृत बालक जन्मास येणे) किंवा "काकवंध्या" योग असेल ( संतती मानसिकदृष्ट्या विकलांग असणे - पंचमात बुध पापग्रहाने बिघडल्यास) , "नपुसंक" योग असेल ( पंचम आणि सप्तम भाव शनि, बुध, केतुने बिघडल्यास)आणि तो आधी समजला तर पुढे काय होणार आहे याची आगाऊ कल्पना असल्यामुळे संतानप्राप्ती न होताही अशी जोडपी आनंदाने एकमेकांबरोबर राहू शकतात. त्याचप्रमाणे ठराविक कालावधीपर्यंत वाट पाहून पुढे द्त्तक घेण्याचा विचारही करू शकतात. ज्योतिषामध्ये संततीसंबंधी ज्या विविध गोष्टी सांगितल्या आहेत त्यातील महत्वाची म्हणजे बीज- क्षेत्र विचार ही आहे. त्यामध्ये स्त्री आणि पुरूषाची fertility कितपत प्रभावी आहे, त्यांना मूल होऊ शकते की नाही याचा सखोल विचार केलेला आहे. बीज म्हणजे पुरूषाचे वीर्य आणि क्षेत्र म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयाची धारणाशक्ती. बीजाची बलवत्ता म्हणजे केवळ sperm count नव्हे तर त्या sperm ची ताकद. त्यात गर्भधारणेची शक्ती आहे की नाही याचा विचार हा बीजावरून केला जातो. बीज कमकुवत असेल तर sperm count चांगला असूनही गर्भधारणा होत नाही कारण कमकुवत बीजात स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत पोहोचून तेथे स्त्रीबीजाचा संपर्क होईपर्यंत जिवंत राहण्याची क्षमता नसते. क्षेत्र म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयाची धारणाशक्ती. जर क्षेत्र दुर्बल असेल, त्यात योग्य वेळी योग्य ताकदीचे स्त्रीबीज येऊन टिकत नसेल तर पुरूषबीज कितीही बलवान असले तरी गर्भधारणा होत नाही. फलज्योतिषात याचा फार सखोल विचार केला आहे. त्यासाठी पुरूष आणि स्त्री दोघांच्या कुंडलीतील बीज आणि क्षेत्र तपासले जाते. पुरूषबीजाची बलवत्ता तपासण्यासाठी पुरूष कुंडलीतील रवी( शक्तीचा कारक), शुक्र (वीर्याचा कारक) आणि गुरू (संततीचा कारक) यांच्या राशी, अंश आणि कलांच्या गणितातून पुरूषबीजासंबंधी निर्णय केला जातो. तसेच स्त्रीक्षेत्रासाठी स्त्री कुंडलीतील मंगळ ( रक्ताचा आणि विटाळाचा कारक), चंद्र (गर्भधारणा शक्तीचा कारक) आणि गुरू (संततीकारक) यांच्या गणितातून स्त्रीबीजाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार दोघांची बलवत्ता ठरवून संतती होऊ शकेल की नाही, हा निर्णय होतो. आज आम्ही असे पाहतो की, अनेक ज्योतिषांना या गोष्टी माहीत देखिल नसतात. संततीची समस्या घेऊन कोणी त्यांच्याकडे गेले की ते ज्योतिषी केवळ पंचमस्थान, त्यातील राशी, त्यातील ग्रह, त्यावर दृष्टी असणारे ग्रह आणि कारक गुरूची कुंडलीतील स्थिती यावरून अनुमान काढत असतात. त्यामुळे अनेकदा जातकांच्या शंकेचे निरसन होण्यापेक्षा त्यांच्या संभ्रमात भर पडते. तसे होऊ नये, ज्यांना या स्वरूपाची समस्या आहे त्यांना त्याबद्दल माहिती व्हावी हा या लेखाचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे ज्योतिषांकडे ही समस्या घेऊन गेल्यावर त्यांना बीज-क्षेत्रासंबंधी जरूर विचारावे. यासंबंधी कोणाला आमच्याकडून मार्गदर्शन हवे असेल तर आम्हाला dhondopant@gmail.com येथे पत्र पाठवावे. आमच्या सेवा सशुल्क आहेत याची कृपया नोंद घ्यावी. आपला, (ज्योतिषभास्कर) धोंडोपंत

वाचन 20913 प्रतिक्रिया 23