मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(...उदरात ढकल काही!)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
राघव यांची अतिशय सुंदर कविता ...उदयात शोध काही! वाचल्यावर अतिशय आनंद झाला आणि शोधाशोध करणारे आपण एकटेच नाही ह्या जाणिवेने बरे वाटले! ;) अजुनी उपास का रे खाण्यावयास काही? की घातलेस पुन्हा ओठांस बांध काही? नेहमीच लाडु दिसतो फडताळ शोधताना.. चैतन्य जागवाया, उदरात ढकल काही! पेटावयास वणवा फक्की जरा पुरेशी.. बोकाणण्यास चिवडा पुरतात क्षणच काही! घे वाडगा पुढे तू खाण्यावयास जगणे श्रीखंड केशराचे उरले अजून काही! काट्यास मोडण्याचा घे ध्यास अंतरी तू! भातात फोडणीच्या, दाणे मिळोत काही! न्याहरीतल्या शिर्‍याचे अस्तित्व संपताना.. पुढच्याच जेवणाला रंगा यथेच्च खाई!! चतुरंग

वाचन 3232 प्रतिक्रिया 0