मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माळढोक पर्वाचा अंत झाला

खिलजि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माळढोक पर्वाचा अंत झाला आता हळूहळू माळरानही संपेल अशीच भूक वाढत राहिली तर उद्या फक्त माणूसच उरेल तो डौलदार असेल , रुबाबदार असेल तो कसा होता ? ते मात्र आता पुस्तकात दिसेल त्याचाही पुतळा बनेल निर्लज्जासारखे रोवत सुटतील त्याला प्रत्येक बागेत किंवा करतील त्याची पेंग्विनसारखी थुकदाणी आणि लीहितील त्यावर " माझा खाऊ मला द्या " मी फक्त ऐकलं होतं त्याच्याबद्दल भरभरून मिळणाऱ्या अनुदानाबद्दल निसर्गप्रेमींच्या त्यागाबद्दल अन गहाणवट पडलेली सरकारी अक्कल अखेर बघायचं राहूनच गेलं त्याला माळरानाच्या माळेतला कोहिनूर निखळला तो जाताच क्षणी , लांडग्याने नंबर लावला एकदा का त्याला कायमचा गिळला मग प्रगतीचा मार्ग मोकळा झाला ): प्रगतीचा मार्ग मोकळा झाला ): सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचन 3993 प्रतिक्रिया 10