झाडांच्या अश्याही कविता
लेखनविषय:
१. प्राक्तनात प्राण लाचार
जगण्याचे आंदण मिळते
फांदीच्या ओलाव्याला
नवजात बांडगूळ गिळते . .
२. फळभरल्या झाडावरुनी
पाखरे निघाली जाया
घरट्याचे छत्र गनिम
नजरेत विषारी माया . .
३. देवडी विसावून पायी
परमार्थ असे बसलेला
पानांचे प्राण खुडून
अर्पितो दान देवाला . .
४. सावलीत शांत झाडाच्या
मरणाची केवळ भ्रांत
खंगलेला, खिन्न मनाचा
झोपला देह विश्रांत . .
५. रसशुष्क वाळली फांदी
वाळीत टाकली कोणी ?
डोळ्यात वाळव्यांच्या
मगरीचे भावुक पाणी . . . .
वाचन
4056
प्रतिक्रिया
12