मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिन्धास भ्या !!!!

चन्द्रशेखर गोखले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मी भ्यायला घाबरत नाही, बिन्धास भितो...! वाटली मला भिती ,तर खुशाल लटपटतो..! घाबरणे आहे तसा, प्राणीजात स्वभाव. भिती वाटते नाकारणे, हा खोटा अहंभाव.. सुरक्षित जगण्या साठी असते आपुली धडपड त्यात झाली गडबड तर वाढते कि हो धडधड असेल जर हे खरे, तर कशास लाजायचे..? उडाली घाबरगुंडी, तर खुशाल घाबरायचे..!! बोट लावता लाजाळु, पान मिटुनी घेते मावळतो रवीराजा अन फुल कोमेजते लाजाळुने लाजावे अन ,फुलाने कोमेजावे याला काय गड्यानो, कोणी पाप म्हणावे...? हा तर आहे जीवनाचा, चिरंतन स्वभाव.. चैतंन्याचा आभाव, तिथे मृत्युचा ठेहराव..! भीत नाही मृत्युला तर, जगता कशाला...? रस्ता ओलांड्ताना सिग्नल बघता कशाला....?? जमेल तेवढे मृत्युला टाळुनी जगायचे, जगण्यासाठी जन्म आपुला का, फुकाच मरायचे....??? म्हणोत कोणी डरपोक , परि नाही लाजायचे.. हो ! घाबरतो मी, असे छाती ठोकुन सांगायचे... बिन्धास भ्यायचे....!!!!

वाचन 3401 प्रतिक्रिया 0