मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तो व मी - लफडा अनलिमिटेड.

दशानन · · जनातलं, मनातलं
तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे. मी- कारे असं का वाटलं तुला ? तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे. मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ? तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला. मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते. तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन. मी- काय झालं व्यवस्थीत सांग. तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच. मी- मग, तु काय केलं. तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत.. जपून वापरा. मी- धत्त तेरी की.. पुढे. तो- ति तनातना गेली पाय आदळत.. पुढील पंधरा मिनिटात काचेचे ग्लास व कप बश्या सगळ्या फुटल्या. मी- तु वाचलास ना ? तो- नाही ती किचन मध्ये भांडी धुत होती, मी नाष्टा मागीतला. तो- जळलेला परठा व आंबट दही दिले.. लोंणचं पण नाही दिले यार. मी- येवढं झालं तरी तुला आठवलं नाही की काहीतरी आज खास डे आहे ते ? तो- अरे आज काल माझा गझनी झालेला आहे, नेहमी काहीना काही विसरतो, मार्केट मुळे डोक्यात पक्त भाव वरखाली वरखाली चालू असतात. मी- अरे येड्या, लेका तुला किती दा सांगितले की ३.३० मार्केट बदं. डोक्यातनं सगळे बाहेर काढायचं लगेच. तो- बरोबर आहे रे पण, त्या दिवशी मार्केट पण चालू नव्हतं सुट्टि होती, तरी देखील आठवलं नाही. मी- तु मिपा वर नाही आला होतास का ? बुंदी पाडल्या प्रमाणे कविता-लेख पाडले होते यार व्हि-डे वर.. ते वाचून तर तुझ्या डोक्यात आलं असंतच. तो- अरे मी मिपावर नाही आलो त्या दिवशी , जमलंच नाही. मी- मग दुपारचे जेवण पाठवले तीने तुला ? तो- नाही. मी फोन केला घरी व विचारले तर म्हणाली डोबंल तुझं... जेवणासाठी फोन करतयं येडं. मी- अरे बापरे... म्हणजे जेवण कलटी ? तुझ्या ऑफिस मध्ये कोणीच नव्हतं का ? आसपास तुला कुठली खुण नाही दिसली व्हि-डेची ? तो- अरे, शनिवार... एखाद दुसरा आजोबा सोडला तर ऑफिस मध्ये कोणिच येत नाही.. त्यात एयरटेलची लाइन खराब होती नेट पण चालू नव्हतं. मी- ह्म्म. मग संध्याकाळी तू सरळ घरी गेला असणार. तो- नाही यार लफडा तेथेच झाला.. एका मित्राचा फोन आला, खांदा मागत होता. मी- अरे अरे, कोण गेलं ? तो- अबे, कोणी गेलं नाही, तो म्हणाला मला रडायला हक्काचा खांदा हवा. मी- असं काय... मग ठीक आहे, पुढे. तो- मग काय मी खांदा दिला त्याने खंबा दिला.. माझाच आवडता ब्रन्डचा. मी- म्हणजे तु टल्ली. तो- नाही जास्त नाही पिली काहीच पॅग मारले तो रडता रडता व्हि-डे च्या आवशीला शिव्या देत होता. मी- का ? तो- त्याच्या बायकोने त्याला घरातून बाहेर काढलं होतं. मी- का रे ? तो- तो व्हि-डेला गिफ्ट नाही घेऊन गेला म्हणुन. तेव्हाच माझी पण ट्युब पेटली. मी- बरं झालं तुला वेळीच आठवलं. तो- अरे नाही यार, आठवलं खरं पण रात्री ९ ला दुकान कुठले उघडे असणार. मी- मग तु काय केलंस. तो- शहर भर भटकलो रात्री ११ पर्यंत. मी- मग काही मिळाले का गिफ्ट. तो- नाही पण एके जागी, नवीनच पॅक केलेले बुके पडलेले दिसलेले... चुकुन पडले असावे अथवा कोणी तरी रागाने फेकले असावे. मी- मग काय केलंस तु ? तो- मी ते बुके उचलले व त्याला व्यवस्थीत केले व तेच घरी घेऊन गेलो. मी- धन्य आहेस, पुढे. तो- दहा मिनिटे तीने दरवाजाच उघडला नाही, पण उघडल्यावर मी तीला ते बुके दिले व हॅप्पी व्हि-डे विश केला स्टाईल मध्ये. मी- ती खुष झाली असणार मग. तो- नाही, काय नुस्तेच बुके म्हणुन तीने ते बुके सोफ्यावर टाकले. मी- मग काय झालं बॉ ! तो- त्या बुक्यातून एक छोटंस कार्ड बाहेर पडलं ते तीने उचललं व सरळ किचन मध्ये गेली. मी- किचन मध्ये का ? चहा करायला गेली असेल तुझ्या साठी तु कार्ड मध्ये काही तरी चांगले लिहले असणार... ती पाघळली... ह्या बायका अश्याच. तो- डोबंलाचं पाघळली, आत जाऊन एक खराटा व लाटणं घेऊन आली.... काली मातेच्या अवतारामध्येच सरळ एन्ट्रीं. मी- का ? ती का भडकली रे ? तो- अरे तीने अर्धा तास धुतल्यानंतर मला विचारले ही "राधिका कोण" म्हणून. मी- आता ही राधिका कोण यार.. मध्येच आली ? तो- अरे ते बुके कुठल्यातरी राधिकेने आपल्या जानु ला गिफ्ट केलं असणार त्यात " जानु, आय लव्ह यु - राधिका." लिहले होते. मी- =)) तो- लेका राजा हसतो आहेस काय.. आता मी काय करु ? परवा पासून तीने जेवायला सोड.... चहा पण नाही विचारला . मी- ह्म्म्म एक काम कर, एखादं नेकलेस गिफ्ट कर... जरा तीला खुष कर... मग हळुच सांग तु ते बुके कुठून आणलं होतंस ते व का ! तो- म्हणजे एका बुक्याची किंमत कमीत कमी पस्त्तीस हजार :O मी- लेका एवढ्यातचं भागलं तर ठीक.. नाय तर किती शुन्य वाढतील पुढील व्ही-डे पर्यंत ते तुला काय त्या ब्रम्ह देवाला पण नाय कळणार... ! तो- ह्म्म ठीक. बघतो ट्राय करुन आज. सांगेन तुला उद्याच. मी- चल. निघतो आता अजून एकाला खांदा देणे आहे, वाट बघत आहे बिचारा.

वाचन 11109 प्रतिक्रिया 0