आंतर्जालावर प्रत-अधिकाराची मालकी कशी ठरावी? मालकाची ओळख काय? चोराची काय?
हल्लीच मिसळपावावर काही सदस्यांच्या अशा लक्षात आले आहे की येथे प्रकाशित झालेले काही लेखन त्यांनी पूर्वी वाचलेले होते. (एक दुवा.) यावर सरपंचांनी धोरणाचे सूतोवाच केले.
(सरपंचांचे धोरण) ते धोरण चोख असले, नैतिक असले, तरी त्याच्या अंमलबजावणीविषयी मनात प्रश्न उभा राहातो.
मिसळपावकर क्षक्ष आणि मायबोलीकर यय दोघेही एकच असू शकतात ही कल्पना मनात चमकून गेली. आता त्यांच्या अन्य प्रतिसादांत दोघांची लेखनशैली एकच की वेगळी, वेगळी असल्यास तो प्रतिभेचा भाग आहे काय? हे प्रश्न आले, तरी त्यांच्या उत्तराने हा प्रश्न सुटत नाही, की वाङ्मयावर मालकीहक्क सांगू शकणार्या एकाच व्यक्तीची ती दोन टोपणनावे आहेत की नाहीत?
आंतर्जालावरचे टोपणनावाखाली वावरणारे व्यक्तिमत्त्व आणि हक्क-कर्तव्ये असलेली कायदेशीर व्यक्ती यांचे नाते काय? हा विषय मिपावर अधूनमधून ओझरता उल्लेखात आला आहे, पण त्यावर साधकबाधक विचारपूर्वक चर्चा झालेली नाही. याविषयी लोकांचे मत जाणून घ्यायला नक्की आवडेल. या चर्चेचा मला काहीतरी उपयोग होईल, असे वाटते. मला काहीही उपयोग नाही करून घेता आला, तरी ही चर्चा मिसळपाव संकेतस्थळास उपयुक्तच ठरावी.
वाचन
5561
प्रतिक्रिया
0