हिवाळ्यातला लदाख - विमानातून दिसणारा महा-हिमालय (समाप्त)
मागील पानावरून ............
तेथून परत मुख्य रस्त्यावरती आलो. तेथून टैक्सी पडून दहा रुपयात मेन चौकात आलो. नंतर रस्ता पार करून चोगलमसर ला जाणारी टैक्सी पकडली आणि जेल पर्यंत यायला अजून पंधरा रुपये लागले. दिल्ली वरून निघताना एक मुंबई वरून फोन आला होता कि, येताना सिन्धु नदीचं पाणी घेऊन ये म्हणून. माज्याकडे अजून खूप वेळ होता. बाटली घेतली आणि सिंधू घाटावर पोहोचलो. चार दिवस झाले लेह फिरतोय. तेच तेच नजारे बघून आता वैताग आला होता. कधी घरी जातोय असे झाले होते. उद्या अकरा वाजता फ्लाइट आहे. त्यामुळे फक्त आजची रात्र लेह मध्ये काढायची होती.
..........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२५ जानेवारी २०१३
आज मला दिल्ली ला जायचे होते. सीआरपीएफ मधील काही मित्र पण आज दिल्लीला जाणार होते. त्यांना सरकार कडून वारंट मिळत ते जम्मू साठी मान्य असतं. पण त्यांना दिल्ली ला जायचे होते म्हणून ते जुगाडाच्या भानगडीत होते. नंतर माहिती पडलं कि त्यांचं हे जुगाड काही जुळून आलं नाही. आता त्यांना जम्मूचेच विमान पकडावे लागणार होते.
विमानाची वेळ सव्वा अकराची होती. मी नऊ वाजताच तिथे पोहोचलो. प्रवेश दारावर ओळखपत्र दाखवल्यावर त्यांनी आत सोडले. आत जाउन बघतो तर खूप मोठी लाइन लागली होती. मी ओळखलं कि, हे दिल्लीला जाणारे प्रवासी आहेत. एका कोपऱ्यात लाईट वरचा हीटर लावला होता आणि दुसरीकडे एका मोठ्या ब्लॉअर मधून गरम हवा येत होती. मी आणि काही प्रवासी तिथे जाउन उभे राहिलो.
जेव्हा मी दिल्ली वरून लेहला आलो होतो तेव्हा अनुभव नसल्याने खिडकी जवळची सीट मिळाली नव्हती. आज मी ती सीट घेण्यासाठी खूप प्रयत्न करणार. साडे दहा नंतर प्रतीक्षा खोली पासून पुढे जाण्याची परवानगी मिळाली तेव्हा तर लाइन अजून लांब झाली होती. मी जर प्रामाणिकपणे लाइन ला थांबलो असतो तर खिडकी जवळची सीट मिळण्याचा प्रश्नच नव्हता. मी लाइन तोडून पुढे जाउन दरवाजाच्या आत घुसलो. मागच्या लोकांनी धिंगाणा करायला सुरुवात केली. तोपर्यंत मी आत गेलो होतो. भारतीय रेल्वेचा अनुभव येथे कामास आला.
दिल्ली वरून येताना हैंड बैग जवळ ठेवायची परवानगी मिळाली होती. पण आता २६ जानेवारी असल्याने हैंड बैग पण मोठ्या सामना बरोबरच जाणार. जवळ काहीच ठेवायचे नाही. कैमेरा जवळ ठेवायची परवानगी मिळाली.
दिल्लीवरून आठवड्यातून तीन वेळा लेह साठी एयर इंडिया ची उडाणे आहेत. दिल्ली वरून जे विमान लेहला येत तेच विमान पुढील दोन दिवस जम्मू आणि एक दिवस श्रीनगरला जातं. मग परत लेह ला येउन दिल्लीला उडान घेत. आम्ही ज्या विमानातून जाणार आहोत ते विमान आता जम्मू वरून येणार आहे. जम्मू वरून येताना ते अर्धा तास उशिराने आलं. त्यामुळे आता ते दिल्लीला सव्वा तास उशिराने निघणार होतं.
एका सुरक्षा दरवाज्यावर जैकेट काढायला लावलं. कैमराच्या कवर वरती सुरक्षित असल्याचा शिक्का मारला. माझ्या हातात सिन्धु नदीच्या पाण्याची बाटली पाहून तो सुरक्षा रक्षक म्हणाला कि, "इसमें से एक घूंट पानी पीओ."
मला कसली भीती होती. त्यातले एक घोट पाणी त्याच्या समोर मी पिलो. पाण्याची बाटली सामाना बरोबर पाठवली नाही. मला म्हणाला कि,"यह लगेज में नहीं जायेगी, इसे साथ लेकर जाओ."
पावणे बारा वाजता विमानात बसण्याची परवानगी मिळाली. पण शेवटचा सुरक्षा दरवाजा पार करताना बाटली काढून घेतली. तरी त्याला मी खूप वेळा सांगितलं कि,"भाई, यह साधारण पानी नहीं है, बल्कि सिन्धु जल है."
पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. शेवटी सिंधू नदीच्या पाण्याची बाटली तेथेच सोडावी लागली. बरोबर साडे बारा वाजता विमानाने अवकाशात झेप घेतली. मला खिडकी जवळची सीट मिळाली होती.
दहा मिनिटातच आम्ही महा-हिमालयावरून जाऊ लागलो. चारी बाजूनी बर्फाचं राज्यं होतं. मला चांगलं माहिती होतं कि विमान कोणत्या दिशेने चाललं आहे. त्यामुळे मी लेह-मनाली रोडच्या शोधात होतो. पण जास्त बर्फामुळे रस्ता सापडलाच नाही. शेवटी हिमाचल प्रदेश मध्ये बारला-चा च्या आसपास एक रस्ता दिसला. परंतु इथे २५० किलोमीटर पर्यंत मानववस्ती नाहीय. त्यामुळे ह्या रस्त्याचा काहीच उपयोग नाही. उन्हाळ्याची गोष्ट वेगळी आहे.
रोहतांग पार केल्यानंतर बर्फ कमी होऊ लागला आणि हिरवळ दिसू लागली. विमानाच्या खाली डाव्या बाजूला मनाली आणि कुल्लू होतं पण ते दिसू शकले नाही. रामपूर पासून विमान निघून रोहडू च्या वर जाउन पोहोचलं. उजव्या बाजूला विशाल शिमला दिसू लागला. त्यानंतर पौंटा साहिब च्या वरून जाउन विमान यूपी मध्ये आलं. खाली यमुना पण दिसू लागली. मैदानात आल्यानंतर धुके दिसू लागलं. काहीच दिसत नव्हतं पण थोडं थोडं समझत होतं. यमुनाच्या पडयाल कुरुक्षेत्र आणि करनाल च्या नंतर पानीपत दिसू लागलं. तेलाच्या कारखान्यातून निघणारा धूर पण दिसत होता. इथून विमानाने दिशा बदलली आणि यमुनाच्या नंतर हरियाना मध्ये प्रवेश केला. सोनीपत पण निघून गेलं. नंतर वाटू लागलं कि बहादुरगढ च्या वरून जाउन मग आपण एयरपोर्ट पोहोचणार पण तितक्यात अचानक विमानाने पलटी मारली आणि ते यमुना पार करून परत यूपी च्या गाजियाबाद जिल्ह्याच्या वरती जाउन पोहोचलं. हिण्डन धाव पट्टी च्या वरून निघून दिलशाद गार्डन आणि वैशाली मेट्रो स्टेशन चे दर्शन घेऊन दिल्लीच्या दिशेने निघालं. दिल्ली मध्ये परत यमुना पार करून पश्चिम दिशेला असणार्या रिंग रोड च्या बरोबरीने ते एयरपोर्टला पोहोचले. इथे बैग शोधायला जास्त वेळ लागला नाही. इथे बैग भेटल्यानंतर परत चेकिंग होत नाही. आपण सरळ घरी जाऊ शकता. इथे आपण कोणाचेहि सामान घेऊन जाऊ शकतो किंवा आपले पण सामान कोणीही घेऊन जाऊ शकतो. इथे आल्यावर आनंदाची बातमी कळली कि, एयरपोर्ट मेट्रो किती तरी महिने बंद असल्यापासून आता परत सुरु झाली आहे. हा पण फुल स्पीड वर चालवलं जात नव्हतं. तरी पण कश्मीरी गेट पर्यंत लागणारा अडीच तासाच्या वेळेपेक्षा एका तासात घरी पोहोचणे , हि सुखावणारी गोष्ट होती.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्षणचित्रे :
 |
| लेह श्रीनगर रोड |
 |
| हा पण लेह श्रीनगर रोड आहे |
 |
| लेहची धावपट्टि आणि बाजुला लेह श्रीनगर रोड |
 |
| बर्फाने आच्छादलेला महा-हिमालय |
 |
| मला असं वाटत कि हे नुन व कुन पर्वत आहे. जे कारगिल-पदुम रोड च्या जवळ आहे. |
 |
| लांब दूरवर पसरलेला महा-हिमालय |
 |
| ह्या फोटो मध्ये खाली लेह मनाली रस्ता स्पष्टपणे दिसत आहे. पण आता ह्या रस्त्यावर खूप बर्फ पडलेला आहे. तो जून मधेच हटणार. |
 |
| जस जसे दक्षिणे कडे आलो तसे बर्फ कमी होऊन जंगल दिसू लागले. |
 |
| सिट च्या समोर दिसनारे आकडे |
 |
| हि नक्किच व्यास नदि असनार |
 |
| शिमला |
 |
| पर्वत सम्पल्या नन्तर धुक्या मधे प्रवेश केला |
 |
| पानीपत |
 |
| यमुना नदी |
 |
| खाली वैशाली मेट्रो स्टेशन दिसत आहे |
 |
| दिल्ली- फरीदाबाद रोड व मेट्रोची बदरपुर कड्ची लाइन |
 |
| लोटस टेम्पल |
 |
| टाटा बाय बाय !! चाललो आम्ही आमच्या घरी |
--------------------------------------------------------------(समाप्त)-------------------------------------------------------------
मागील भागात जाण्यासाठी...
या लेखातील सर्व भाग वाचण्यासाठी खालील लिंक्स वर जावा