मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद....

मुक्त विहारि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मूळ प्रेरणा (http://misalpav.com/node/34317) दरेक धाग्याला प्रतिसाद असतो. प्रत्येक सदस्याचा वेगळा असतो. प्रतिसाद सुखद असतो किवा दु:खद असतो. दु:खद प्रतिसाद आपल्या लिखाणाच्या उर्मीवर काळी छाया पसरवतो सुखद प्रतिसाद लिखाणाला प्रेरणा देतो. मलाच दु:खद प्रतिसाद का म्हणून विचारू नये. दु:खद प्रतिसाद दुसऱ्याला का नाही? म्हणून खंतावू नये. कोणता प्रतिसाद मिळेल हे आपल्या लिखाणावर अवलंबून असते. मित्रानो, प्रत्येक प्रतिसाद घेत जावे. प्रत्येक प्रतिसाद शिकत जावे. दु:खद प्रतिसादाने खचू नका. गहन विचारवंतांचा आदर्श ठेवा. ते ही न जमल्यास, नानांचा हितोपदेश लक्षांत ठेवा. धागे आणि प्रतिसाद, हे मिपाचे चक्र आहे. प्रतिसादांचे अनुभव घेवून जा. डिस्क्लेमर =====> बरेच दिवसांत आम्ही धागा न टाकल्याने, आम्ही आमचा लेखन कंडू शमवत आहोत.

वाचन 2753 प्रतिक्रिया 0