मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक - एक सामान्य प्रकटन

कोलबेर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
'आंतरजालावरील आवडते लेखक' हा तवा सध्या तापलेला बघून आमच्यासारख्या सामान्य वाचकाला देखिल आपली पोळी भाजून घ्यायचा मोह अनावर झाल आहे! काहीही म्हणा पण आवडते लेखक ह्यावर बोलणे आता, संजोप राव, तात्या, सर्किट ह्यांच्या उल्लेखाशिवाय अशक्यच झाले आहे. त्यामूळे नाईलाजास्तव आम्हाला ह्या तिघांच्या लेखनानेच सुरूवात करावी लागते आहे. तर सुरू करुया सं'जीए'प रावांपासून. सध्या ह्यांचे प्रस्थ आंतरजालावर भलतेच आहे. ह्यांच्या अनेक लेखांना भरघोस प्रतिसाद मिळत असले तरी ह्यांनी लिहीलेला आमच्या आवडीचा लेख म्हणजे पदार्पणात लिहिललेला तो तीन ओळींचा मनोरुग्णांवरील लेख. अहाहा 'सनातन.कॉम' वरती काय खळबळ उडवली होती तेव्हा. नंतर मात्र कधी ह्यांचे लिख़ाण ती पातळी गाठू शकले नाही हेच खरे. असो अधून मधुन मातीचे पाय सरखे अनुवाद वगैरे ते लिहीत असतात आणि आम्ही त्यांचा ब्लॉगवर जाऊन त्यांना (एकमेव) प्रतिसाद देखिल देतो. ह्यांची एक निश्चित शैली आहे राखुंडे, आठ्याळ हे असले शब्द वाचले की आयडी कुठलाही असला तरी लेखणी सरांचीच आहे हे बिनधास्त ओळखावे. त्याचबरोबर 'साखर भातावर अंडाकरी टाकणे' या सारखे अविस्मरणीय वाकप्रचार ह्यांनी मराठी भाषेला बहाल केले आहेत. अर्थात संजोप रावांचा उल्लेख झाल्यावर तात्याकाकांचा अनुल्लेख करुन आम्हाला मिसळपाववर जाहिर भादरुन घ्यायची नाही आहे. तसे आम्हाला तात्याकाकांचे लेखन देखिल भयंकर आवडते आणि तात्यांचा उल्लेख सगळ्यांनी 'तात्याकाका' असा करावा असे आम्हाला मनोमन वाटते, कारण भाईकाकांनंतर महाराष्ट्रात कुणी व्यक्तिचित्रण हा प्रकार प्रभावीपणे हाताळला असेल तर तो आमच्या तात्याकाकांनीच. अर्थातच ह्यासाठी आम्हाला कुणा डॉक्टरीण बाईंकडून आलेल्या सुनिता ताईंच्या प्रमाणपत्राची गरज वाटत नाही. तात्यांनी शास्त्रिय संगीता विषयीच लिहावे (कारण त्यांना तेवढेच जमते) असल्या अर्थातच कुजकट विचारांशी आम्ही असहमत आहोत. 'ह्या चित्तोबावरच एखादे व्यक्तिचित्र लिहितो' असा विचार करणारे तात्यांची गंभीर मुद्रा असलेले छायाचित्र तर आम्ही जपून ठेवले आहे. तात्यांकाकांना त्यांच्याच होम ग्राउंडवर, म्हणजे अर्थातच संगीत क्षेत्रात नडून आंतरजाल क्षेत्रात झालेले सर्किट ह्यांचे धडाकेबाज पदार्पण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. ह्यांचे पडीक ह्या शब्दाला लाजवणारे मराठी संकेतस्थळांवरील वास्तव्य, 'मराठी संकेत स्थळांवरील उखाळ्या पाखाळ्या' ह्या विषयाचा आपल्या पीएचडी विषयापेक्षा अधिक असलेला व्यासंग आणि त्यासाठी याहू नामक पाश्चात्त्य कंपनी कडून घेतलेला गलेलट्ठ पगार बघता त्यांच्या बुद्धिमत्तेचे आम्हाला अपार कौतुक वाटते. अर्थातच त्यांचा हा हिरव्या गार नोटांचा सत्यनारायण काही मंडळींच्या डोळ्यात चांगालाच खुपतो त्यातून बरीच खडाजंगी होते आणि आम्ही डबे डबे भरून पॉपकॉर्न नावाच्या लाह्या खात सगळ्याची मजा लुटतो. तर मंडळी आमच्या सामान्य लेखणीतुन इतकेच उतरू शकले पॉलीटीकली करेक्ट राहण्यासाठी अत्यानंद वगैरे उल्लेख आवश्यक आहेत पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!!!

वाचन 6951 प्रतिक्रिया 0