मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हात-पाय तोडले पाहिजेत!

विसोबा खेचर · · काथ्याकूट
मुंबईतील जुहू भागात नववर्षदिनाच्या जल्लोषात मुलींचा विनयभंग झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना नुकतीच घडली. योगायोगाने तिथे उपस्थित असलेल्या, हिंदुस्तान टाईमस च्या सतीश बाठे आणि प्रसाद गोरी या दोन पत्रकारांनी झाल्या प्रकाराची प्रत्यक्ष छायाचित्रे घेतली आणि हिंटा मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली. या छायाचित्रात आरोपींचे चेहेरेही स्पष्ट दिसत आहेत. थोरल्या आबासाहेबांच्या राज्यात, मुंबईसारख्या स्त्रियांकरता सुरक्षित समजल्या जाणार्‍या शहरात अशी घटना घडते ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. मुंबईसारख्या शहरात ही स्थिती तर खेडोपाडी काय परिस्थिती असेल? स्त्रियांच्या विनयभंगाची/बलात्काराची सगळीच काही प्रकरणं पुढे येत असतील असंही नव्हे! नववर्षाचा जल्लोश, त्यात मुलामुलींची थोडीफार जवानीतली थट्टामस्करी समजण्यासारखी आहे. परंतु भररस्त्यात मुलींचे कपडे फाडण्यापर्यंत जर कुणाची मजल गेली असेल/जात असेल तर अश्या आरोपींचे हातपाय तोडले पाहिजेत किंवा त्यांचे लिंग जाहीरपणे कापून टाकले पाहिजे असे माझे मत आहे. आपले मत काय? तात्या.

वाचन 31544 प्रतिक्रिया 0