मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अपवाद

पॅपिलॉन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पल्याडचे गवत नेहेमीच अधिक हिरवे वाटणार्‍यांच्या गर्दीत, एकनिष्ठ सहजीवन अंगिकारणारे नेहेमीच अपवाद असणार. आपले कोमल हात, विशाल पर्वताच्या गळयात लडिवाळपणे टाकून, त्याच्याशी प्रियाराधन करणार्‍या नदीला, सागराची धीर-गंभीर गाज मोह घालते आणि ती पर्वताला सोडून, सागरात विलीन होण्यासाठी, बेभान, बेधुंद होऊन धावत सुटते. प्रियकराला सोडून आपल्या कुशीत आलेल्या पुष्ट सरितेला पाहून समुद्रही सुखावतो पण तोही अधून्-मधून चकवा देणार्‍या चंद्रिकेच्या पाशात अडकतो. पूर्ण यौवनाने मुसमुसलेल्या पौर्णिमेच्या रात्री तर तो धीर सोडून उचंबळू लागतो! त्या एकाकी तळ्याच्या कोपर्‍यात ते हंसद्वय मात्र एकमेकांत गुंतलेले असते, भोवतालच्या जगाची पर्वा न करता!

वाचन 2251 प्रतिक्रिया 0