अपवाद
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पल्याडचे गवत नेहेमीच अधिक हिरवे वाटणार्यांच्या गर्दीत, एकनिष्ठ सहजीवन अंगिकारणारे नेहेमीच अपवाद असणार.
आपले कोमल हात, विशाल पर्वताच्या गळयात लडिवाळपणे टाकून,
त्याच्याशी प्रियाराधन करणार्या नदीला,
सागराची धीर-गंभीर गाज मोह घालते
आणि ती पर्वताला सोडून, सागरात विलीन होण्यासाठी,
बेभान, बेधुंद होऊन धावत सुटते.
प्रियकराला सोडून आपल्या कुशीत आलेल्या पुष्ट सरितेला पाहून समुद्रही सुखावतो
पण तोही अधून्-मधून चकवा देणार्या चंद्रिकेच्या पाशात अडकतो.
पूर्ण यौवनाने मुसमुसलेल्या पौर्णिमेच्या रात्री तर तो धीर सोडून उचंबळू लागतो!
त्या एकाकी तळ्याच्या कोपर्यात ते हंसद्वय मात्र एकमेकांत गुंतलेले असते,
भोवतालच्या जगाची पर्वा न करता!
वाचन
2251
प्रतिक्रिया
0