मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क
लेखनप्रकार
हा भाग खरे म्हणजे कलादालनातच टाकायचा कारण फारसे काही लिहिणार नाही आहे. परंतु केवळ एका लेखमालिकेचा भाग म्हणुन इथेच देत आहे.
काश्मीरचे आणि ट्युलिपचे जवळचे नाते आहे. भारतात एरवी ट्युलिप बघायला मिळत नाहीत आणि ट्युलिप बघण्यासाठी हॉलंडला जायची ऐपत प्रत्येकाकडे असतेच असे नाही त्यामुळे काश्मीरच्या ट्युलिप गार्डनचे फार आकर्षण होते. दुर्दैवाने आम्ही श्रीनगरला पोचण्याच्या केवळ १ दिवस आधी श्रीनगरचे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.
ज्या ट्युलिपवर एकेकाळी हॉलंडची आख्खी अर्थव्यवस्था उभी होती आणि ज्याच्यामुळे एकवेळ अर्थव्यवस्थेला अभूतपुर्व चालना मिळाली आणि नंतर त्याच ट्युलिपमुळे अर्थव्यवस्था मंदीला सामोरी गेली त्या ट्युलिप बद्दल आकर्षण तर होतेच. केवळ हॉलंड मध्येच नाहीतर संपुर्ण युरोपात एकेकाळी या ट्युलिपने धमाल उडवुन दिली होती. आजकाल जशी रोख्यांची खरेदी विक्री होते तशी एकेकाळी युरोपात ट्युलिपच्या फ्युचर्सची खरेदी विक्री व्हायची. ट्युलिप्स हिरे माणकांपेक्षा महाग झाले होते. ट्युलिपचा कंद चोरुन खाल्ला म्हणुन एका खलाश्याला चक्क कारावासही पत्करावा लागला होता. एक कंद त्याच्या आख्ख्या जहाजावरच्या सर्व खलाशीवर्गाच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा महागडा होता म्हणे. एवढे अमाप ऐश्वर्य नूरजहाच्या गुलाबाच्या बागेतल्या गुलाबाने देखील कधी बघितले नसेल. हा एवढी वैभवशाली इतिहास असणारा ट्युलिप बघायला मिळणार नाही म्हणुन आम्ही खट्टु झालो होतो. पण सुदैवाने पहलगामच्या पोशवान पार्क मध्ये थोडेफार ट्युलिप बघायला मिळाले आणि दुधाची तहान आम्ही ताकावर भागवली. :)
हे पोशवान पार्कचे असेच काही फोटो:
वाचन
8143
प्रतिक्रिया
0