काही नवे करावे म्हणून.
लेखनप्रकार
रत्नागिरी येथे पूर्वी अंगण नावाचे खाद्यगृह होते.जेवण झकासच असायचे.आपणपण इथे एक खाद्यगृह सुरु करूया, अशी इच्छा मनात धरून जागा शोधायला सुरुवात केली.जागांच्या अव्वाच्या सव्वा किंमती पाहून थंडावलो.पण तुमच्याकडे पैसे आहेत हे दलालांना समजले की,जागांच्या वेगवेगळ्या ऑफर्स यायला सुरुवात होते.त्यप्रमाणे कोणीतरी फणसोप येथी आंबाच्या बागेची माहिती सांगितली.
जागा पाहून आलो तेव्हा ऐन मे महिना.झाडे रोपदळच पण आंबे लागलेले.सोबत आई होती.तिच्या माहेरी म्हणजे माझ्या आजोळी आंब्याचे उत्पन्न भरपूर.अनुभवही खूप."एकदा बाग घेतली तर पन्नास ते साठ वर्षे बघायला नको" असा तिचा शेरा.जागेत पाण्याची सोय नव्हती पण जवळच ओहोळाचे पाणी होते.एल टाइपचा प्लॉट होता.दोनही बागांना दगडी .कुंपण त्यावर पुरुषभर उंचीचे निवडून्गाचे कुंपण.दोन्ही बागेमधून पायवाट.श्री.प्रकाश जोशी या बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून काम करणारया गृहस्थांच्या पत्नीच्या नावे ही बाग होती.माझ्या वडीलांचे घर व नारळग भाटमिरया, रत्नागिरी येथे असल्याने मी शेतकरी कुटुंबातील आहे म्हणून मी तीजागा माझ्या नावावर घेऊ शकत होते.श्री.जोशी यांच्या बंधूच्या शिवाजीनगर इथल्या घरी जाऊन व्यवहाराची बोलणी झाली.सात बाराचा उतारा वगैरे जरुरी कागद पाहिले.त्यांच्यागोदर ती बाग मधुकर साळवी यांच्या नावावर वंश परंपरेने आलेली होती.श्री.जोशी यांचे मामाही फनणसोप येथेच राहत असल्याने त्यांना त्या बागेची सर्व माहिती होती.आता श्री.साळवी हयात नव्हते.त्यांनी दहा वर्षांपूर्वीच ही बाग विकली होती.त्यांचे घर गावात होते.पण त्यांचा मुलगाही वारल्यामुळे त्यांची पत्नीही मुलीकडे मुंबईलाच रहात होती.सगळी माहिती घेतली आणि जागा घेण्याचे ठरवले.यथावकाश कागदपत्रे होऊन व्यवहार झाला. आता सातत्बाराला नाव लावणे या प्रक्रियेला सुरुवात केली.शेत कारी कुटूबम्बतील व्यक्तीचे प्रमाणपत्र घेतेवेळी नायब तहसीलदार श्री.आंब्रे यांचा परिचय झाला होता.व्यवहाराची कागदपत्रे लावून मूळ अर्ज त्यांना सदर केला आणि प्रत मंडळ निरीक्षक आणि तलाठी यांच्याकडे सदर केला.तलाठी कार्यालयात आमचा नंबर येईपर्यंततिथे येणाऱ्या लोकाशी तलाठी महाशय कसे वागतात हे दिसत होते.येणाऱ्या माणसांकडे सिगारेट,गुटख्याची पाकिटे,जेवनाच डबा ई.ई.च्या मागण्या चालू होत्या.माझा अर्ज पाहून तहसिलदारहेबना द्यायची काही गरज नव्हती असा शेरा मिळाला. मी काही न बोलता पोच घेऊन निघाले.
एक महिना झाला चौकशी केली तर आंब्रे म्हणाले,,"पाठवला आहे तुमचा अर्ज.अजून नाही मिळाला का सात बारा तुम्हाला?"
मी म्हटलं, "नाही अजून"त्यंनी लगेच मंडळ अधिकारीना फोन केला.त्यांनी सांगितलं,"तलाठी कार्यायात जाऊन घ्ययला सांगा. कार्यवाही झालेली आहे.आता तहसीलदार कार्यालय रत्नागिरीत आणि तलाठी कार्यालय फणसोपमध्ये.दोन्ही कार्यालयात जाण्यासाठी एस्टीशिवाय पर्याय नाही.म्हणजे मध्ये तासभर सहज मोडायचा.मधल्यावेळात मं .नि.महाशयांनी तलाठी महाष्ण फोन करून सांगितले,की,मी येतेय.मी तिथे पोचेपर्यंत तलाठी महाराज गायब.कार्यालयात चौशी केली तर ग्रुप ग्रामपंचायत असल्याने दुसऱ्यागावाला गेलेत असे समजले. "पण आज इथला दिवस आहे ना?" न राहवून मी विचारले."हो.पण वसुलीसाठी कधीही जाऊ शकतात."आता यातली मख्खी अशी कअशावेळी खिशातले पैसे भरून पावती दाखवली जाते. पण आपण काही बोलू शकत नाही."बर तर परत येतील न?""हो,हो,ती काय पिशवी आहे तिथेच.आणि गावातच राहतात ते."मी वाट पाहत बसले.दोन_तीन तासांनी महाराज उगवले.म्हटलं ,"मी मिसेस सावंत .सात बाराचा उतर घ्यायला आलेय."
"हो,हो.हा काय तुमचा उतारा तयार आहपण फेरफार बुकावर मंडळ निरीक्षकांची सही नाही झालीये.त्यामुळे देता नाही येणार."मग आता ?""उद्या यांना ,मी उद्या त्याची सही घेऊन ठेवतो." या वर बोलाण्यासारखे काहीच नाही.मला त्याच दिवशी परत यायचे होते.त्यांना तसे न सांगता मी"ठीक आहे."म्हणून
तिथला फोन नंबर घेऊन मी निघाले.विचार केला कीआता आपले उपद्रवमूल्य दाखवले पाहिजे.परत तहसीलदार कार्यालयात येऊन पहिले तर तहसिल्दार्साहेब अजून काम करत संधी घेतली तर तिचे चीज झाले.त्याच्याकडे जाऊन त्यांना सर्व सांगितले. तेही अवाक झाले. शपाई पाठवूनमं.नि.ना बोलावले तर ते घरी गेल्याचेसमजले. मला म्हणाले,"माफ करा,पण आता तुम्हाला उद्याच यावे लागेल."मी म्हरले",पण मला आज मुंबईला जायलाच लागेल कारण माझी रजा मी वाढवू शकत नाही.""नोकरी करता का तुम्ही?" इति तहसीलदार साहेब.मी,"हो न?"कुठे हो ?" तहसीलदार साहेब.मी,"मंत्रालय." एव्हापर्यंत कागदपात्रांवर सह्या करत माझ्याशी बोलत असलेल्या तहसीलदारसाहेबांनी वर पहिले. "काय म्हणता कय? मंत्रालय?" उत्तरादाखल माझे स्मितहास्य."कोणता विभाग?"इति तहसीलदार साहेब." सामान्य प्रशासन विभाग." मी ."आधी नाही बोललात?"." इति तहसीलदार साहेब."आधी गरज भासली नव्हती.तुम्ही तुमचे काम चोख केले होते." ते हसले.मला विचारले, आणि मिस्टर काय करतात?" मी,"तेही मंत्रालयातच.""मी त्यांना सांगितलं."मी तर आज चाले.उद्या भावाला पाठवते.चालेल ना" "हो.हो.जरूर. इति तहसीलदार साहेब.मी त्याच रात्री भावाला सूचना देऊन मुंबईला आले.दुसऱ्या दिवशी भावाचा फोन आला,"ताई,मी आज जाऊन आलो फणसोपला.तो चाफेरकर (तलाठी)काय म्हणाला म्हीतीय? तुमची बहिण आणि मेहुणे मंत्रालयात आहेत न?मग मग त्यांना माहिती नाही वटते काम कसे करतात?वजन कसे ठेवतात?मी त्याला सांगून आलोय की, ताई येऊन तुझ्या डोक्यावरच वजन मारेल म्हणून?" "ठीक आहे."असे म्हणून मी फोन ठेवला. (क्रमशः
वाचन
20221
प्रतिक्रिया
0