मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संक्रांतीच्या शुभेच्छा

नंदन · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
१. अर्थातच ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे. २. कुणालाही आक्षेपार्ह वाटल्यास उडवून लावली तरी चालेल. अल्फा असो वा याहू! बेटा 'गामा' पैलवान फाटे फोडी पिंक टाकून चौपाटीवर ठेल्यावर तंबाखू चोळी अनिवासी त्या बोधकथेतील चिखल पसरे जिकडेतिकडे कुणा दिसती अनेक माद्या कुणा दिसती गोरी माकडे सदाचाच हा खेळ चालला जुने गडी पण नवेच भांडण वैशाखाचा वणवा 'चैत्री' कळपांचे माद्यांना आंदण वाचा चावा फरक कळेना 'किट'ले अमुचे कान एबीजीएस कुणी बोलतो बलसागर देश महान 'शिरा' ताणुनि पान ओरडे पुरे जाहला चुना चंचीबांधव आपण सगळे का मग हा 'सामना' नवे वदति नवल देखुनि हे अमुच्याहूनही सान ल्हानांहुनि पण ल्हान जाहले विसरूनी सारे भान पुन्हा 'मिसळ'तील सारे जरी आज उठे आकांत शिमग्यामागून येते उफराटी गोडबोली संक्रांत

वाचन 5043 प्रतिक्रिया 0