म्हण (शतशब्द्कथा)
''बाबा , फॉक्स तर फ्रूट्स नाई खात ना?''
नाही बेटा .
''मग इथं गोष्टीत कसं लिहिलंय ?''
बघू .
ती म्हण आहे, म्हण .
''काय म्हणू?'''
अगं तू काई म्हणू नकोस, त्याला 'म्हण' असं म्हणतात.
लहानशा गोष्टीतून काहीतरी सांगितलेलं असतं .
''पण फॉक्स तर नॉनवेज खातो ना?''
तसं नाही बेटा - कुणाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तो म्हणतो ना -'' मला तर ती नकोच होती '' - त्याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षं आंबट - कारण कोल्हा पण असाच लबाड असतो.
***
जयाकाकू आलेल्या.
सारखं बोलतच रहातात .
म्हणाल्या '' पिंकीला सेंट जोसेफला नाई मिळालं - आम्हालाही नकोच होतं इतकं लांब !''
मी विचारलं '' म्हणजे कोल्ह्याला द्राक्षं आंबट ना?''
आई रागावली मला .
काकू पण चिडलेल्या बहुतेक .
उगाचच !
वाचन
5224
प्रतिक्रिया
0