मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुष्काळ आणी पॅकेज: काही किस्से ३ (अंतिम)

जेपी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भाग १ भाग २ ================================================================================== वेळ:- मागच्या काळात कधी तरी.. एके काळी 'गरीब ग्राहकानां अन्न परवडावे' या मिषाने सरकार पध्दतशीरपणे शेतीमालाचे भाव पाडत असे.लेव्ही लावणे.तसेच मोक्याच्या वेली स्वतःची कोठारे उघडुन पुरवठा वाढवणे,आपल्या शेतकर्‍यांवर निर्यात बंदी लादणे आणी प्रसंगी तोटा सोसुन शेतमाल आयात करणे.. असे मार्ग सरकार वापरात असे.त्याकाळी शेतकर्‍याला उत्पादन खर्चसुद्धा भरुन निघणार नाही इतका कमी भाव मिळत असे.अशा विशीष्ट तोट्याला 'निगेटीव्ह सबसिडी 'म्हणतात. या सगळ्या विरुद्ध एका माणसाने हमिभाव मिळवुन देण्यासाठी आंदोलन उभे केले.मुळात तो माणुस शेतकरी नव्हता.. पण कुणी तरी आपल्या साठी उभे राहतय हे कळाल्यावर शेतकरी त्याच्या मागे एकवटला.हमिभावाचे आंदोलन यशस्वी झाले. हे यश एकवटलेल्या शेतकर्‍याचे होते.पण त्या माणसाला हे स्वत:चे यश वाटले.आसपास असनार्‍या भाट आणी तोंडपुंज्या लोकांनी त्याच्या या भ्रमात भर टाकली.त्या माणसाच्या डोक्यात हवा गेली आणी त्याला सत्तेची स्वप्न पडु लागली. त्या माणसाचे नाव होते ..शरद जोशी. ================================================================================== वेळ:- वरचीच... याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एक माणुस वर वर येत होता.सत्ते साठी कुठल्याही पातळीला जाण्याची त्याची तयारी होती.प्रसंगी पाठीत खजींर खुपसायची ही त्याची तयारी होती.त्याच्या बोलण्यात आणी गप्प राहण्यात काही तरी गुढ असायच. त्या माणसाच नाव होते..शरद पवार. ================================================================================ वेळ-तेव्हांपासुन आतापर्यंत... शरद जोशी च्या मागे एकवटलेला शेतकरी चांगली व्होटबँक होऊ शकतो हे चाणाक्ष शरद पवारांच्या लक्षात आले. जोडीला प्रमोद महाजन नावाचा आणखीन एक राजकारणी मिळाला.दोघांनी मिळुन शरद जोशीला सोबत घेतले. त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी...'पुलोद"..सरकारचा प्रयोग केला. पुलोद चे पुढे काय झाले हे सर्वांना ठावुकच आहे.कालांतराने शरद जोशी बाजुला फेकले गेले.प्रमोद महाजन यांना शेतकर्‍यांना आपल्या बाजुला वळवता आले नाही.साहजीक शेतकरी एकाच व्यक्ती मागे गेला.शरद पवार. पण जसा जसा काळ पुढे गेला तसा शेतकर्‍याचा आपल्या नेत्यावरील विश्वास उडु लागला.शरद पवारांना आपल्या मागील व्होटबँक टिकवण्यासाठी काही तरी करणे गरजेचे होते.. यातुन सुरु झाला पॅकेज चा खेळ... ================================================================================ जाता जाता- पुर्वी शेतकरी म्हणल की नांगर घेतलेला माणुस आठवायचा..आता फासावर लटकलेला आठवतो. ३ दिवसापुर्वी एका तरुण शेतकर्‍यांने अवघ्या ३२ हजांरासाठी आत्महत्या केली. १२ वर्षात ६० हजार कोटी (निट वाचा) ची पॅकेज जाहीर झाली. ८० हजार कोटी सिंचनावर खर्च झाले. यातले १० % जरी योग्य पोहचले असते तरी त्या शेतकर्‍याचा जिव वाचला असता. याचा दोषी कोण ? याचा विचार केला तर नजरे समोर येतात पॅकेज चा खेळ करणारे राजकारणी,शेतकरी मरतोय तर मरु द्या आमच दुकान चालल पाहीजे म्हणणार्‍या शेतकर्‍यांच्या संघटना आणी या सगळ्यात भरडत जाणार शेतकरी... (समाप्त) ( हा माझा शेती विषयक ईथे शेवटचा लेख.कारण शेतीवर भाष्य करायचा अधिकार काही काळापुरता स्थगित करत आहे.)

वाचन 15221 प्रतिक्रिया 0