मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरव्या मिरच्यांचा ठेचा

आरोही · · पाककृती
हा प्रकार आमच्या घरी नेहमी होतो ..तसा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करतात .आमच्या घरी जास्त तिखट सहन होत नसल्याने आम्ही या पद्धतीने करतो ..यासाठी आपल्याला खालील साहित्य लागेल. साहित्य :कमी तिखट हिरव्या मिरच्या ९-१०,लसुन पाकळ्या ८-९, एक टोमाटो,३ चमचे तेल,मीठ चवीप्रमाणे . कृती :सर्व प्रथम मिरच्या धुवून कापून त्यांचे काप करावेत.. 1 एका कढाई मध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्या मिरच्या परताव्यात . मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या कि एका मिक्सर च्या भांड्यात किवा (खलबत्ता असल्यास त्यात)मिरच्या लसुन आणि मीठ घालून थोडे सरबरीत बारीक करावे आता कढाई मध्ये तेल टाकून त्यात तयार ठेचा टाकावा तो नीट परतावा . 2 साधारण फोटोप्रमाणे रंग आल्यावर(म्हणजे मिरच्या shijalyavar ) त्यात टोमाटो बारीक कापून टाकावे आणि परतावे . टोमाटो शिजत आल्यावर थोडा त्यातच smash करावा .. बाजूने तेल सुटायला लागले कि ठेचा तयार .. 3 5 हा ठेचा भाकरी बरोबर अप्रतिम लागतो ..माझ्याकडे भाकरीचे पीठ संपल्याने मी मात्र गरम गरम वरण भातासोबत खाल्ला ...+)

वाचन 20181 प्रतिक्रिया 0