(आनंदाने)
Taxonomy upgrade extras
अजब यांना 'आनंदाने' कविता करताना बघून मला राहवले नाही, अर्थात तत्काळ विडंबन धर्माला जागणे क्रमप्राप्त होते! ;)
पुन्हा पुन्हा तो कविता रचतो, आनंदाने
सरसावुन मी लगेच बसतो, आनंदाने...
शब्द बदलणे अवघड नसते माझ्यासाठी
बोरू त्याचा तोच झिजवतो, आनंदाने...
जालावरती टुकार कविता तुडुंब मिळती
जुन्या नव्या मी सर्व उसवतो, आनंदाने...
"विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? "
चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने...
पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो;
आता गजला तासत सुटतो, आनंदाने...
लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो
विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने...
चतुरंग
वाचन
2753
प्रतिक्रिया
0