मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कन्नडा हाडु

आजानुकर्ण · · जनातलं, मनातलं
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!) आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण. पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे. या गाण्याचे देवनागरीतील भ्रष्ट उच्चार व मराठीतील अर्थ प्रत्येक कडव्याखाली देत आहोत. बघा आवडतो का ते. ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು..ನೀನೇನೆ ನನ್ನವಳಿದ್ದು ಮಾಯದ ಲೋಕದಿಂದ..ನನಗಾಗೆ ಬಂದವಳಿದ್ದು ಆಹಾ ಎಂಥ ಮಧುರ ಯಾತನೆ ಕೊಲ್ಲು ಹುಡುಗಿ ಒಮ್ಮೆ ನನ್ನ..ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು.. अनिसुतिदे याको इंदु.. नीनेने नन्नबळिंदु मायदा लोकदिंदा...ननगागे बंदबळिंदु आहा एंथा मधुरा यातने कोल्लु हुडुगि ओम्मे नन्ना... हागे सुम्मने अनिसुतिदे याको इंदु मला हे असे आज का वाटत आहे कोण जाणे की केवळ तूच एक माझ्यासाठी आहेस मायावी दुनियेतून खास माझ्यासाठीच तू आज आली आहेस हाय! काय गोड यातना आहे ही हे मुली मला मारून टाक बरे, उगीचच. ---------------------೧------------------------- ಸುರಿಯುವ ಸೋನೆಯು ಸೂಸಿದೆ..ನಿನ್ನದೆ ಪರಿಮಳ ಇನ್ನು ಯಾರ ಕನಸಲೂ..ನೀನು ಹೋದರೆ ತಳಮಳ ಪೂರ್ಣ ಚಂದಿರ ರಜ ಹಾಕಿದೆ..ನಿನ್ನಯ ಮೊಗವನು ಕಂಡ ಕ್ಷಣ ನಾ ಖೈದಿ ನೀನೆ ಸೆರೆಮನೆ ತಪ್ಪಿ ನನ್ನ ಅಪ್ಪಿಕೊ ಒಮ್ಮೆ..ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು.. सुरियवा सोनेया सोसिदे... निन्नदे परिमळा इन्नु यार कनसलू... नीनु होदरे तळमळा पूर्ण चंदिरा रजा हाकिदे... निन्नय मोगवनु कंड क्षणा ना खैदि नीने सेरेमने तप्पि नन्ना अप्पिको ओम्मे... हागे सुम्मने पावसाने तुझा नशीला गंध सोबत आणला आहे. तुझा चेहरा क्षणभर पाहिल्यावर पौर्णिमेचा चंद्रही आकाशातून लाजून पळून गेला आहे तू एक तुरुंग आहेस आणि मी एक कैदी. असेच मला मिठीमध्ये घट्ट धरून ठेव. उगीचच ---------------------೨------------------------ ತುಟಿಗಳ ಹೂವಲಿ..ಆಡದ ಮಾತಿನ ಸಿಹಿಯಿದೆ ಮನಸಿನ ಪುಟದಲಿ..ಕೇವಲ ನಿನ್ನದೆ ಸಹಿಯಿದೆ ಹಣೆಯಲಿ ಬರೆಯದ ನಿನ್ನ ಹೆಸರ..ಹೃದಯದಿ ನಾನೆ ಕೊರೆದಿರುವೆ ನಿನಗುಂಟೆ ಇದರ ಕಲ್ಪನೆ ನನ್ನ ಹೆಸರ ಕೂಗೆ ಒಮ್ಮೆ..ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ तुटिगळा हुवलि... आडद मातिना सिहियिदे मनसिना पुटदलि..केवला निन्नदे सहियिदे हण्णेयलि बरेयदा निन्ना हेसरा... हृदयदि नाने कोरेदिरुवे निननुंटे इदरा कल्पने नन्न हेसरा कोगे ओम्मे... हागे सुम्मने तुझ्या ओठांवरील रंगांना तू न बोललेल्या शब्दांचा गोडवा आहे माझ्या हृदयातील पानांवर केवळ तुझ्याच स्वाक्षर्‍या आहेत तुझे नाव दैवाने माझ्या नशिबी लिहिलेले नसून मीच ते माझ्या हृदयात कोरले आहे तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे उगीचच

वाचन 14800 प्रतिक्रिया 0