अचानक छोटेखानी मिपा कट्टा! :)
राम राम मंडळी,
कालची बाप्पाची सुट्टी संपली आणि आज आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या रोजच्या कामधंद्यात गर्क होतो. एका अशिलाच्या हापिसात काही कामानिमित्त बैसलो होतो. तेवढ्यात आमचा भ्र ध्वनी किरकिरला,
"तात्या, मी बिपिन. बिपिन कार्यकर्ते. आहेस का खपलास रे? तुला भेटायचंय!"
अरे वा! कार्यकर्तेसाहेब आम्हाला भेटू इच्छितात याचा आम्हाला लै आणंद (च्यामारी, मा**व त्या शुदलेखनाच्या!) वाटला. आम्हीही त्यांना भेटू इच्छित होतोच.
"अरे आत्ता जरा मी पोटापाण्याच्या उद्योगात अंमळ मग्न आहे, जरा वेळाने भेटू."
"ओक्के, तात्या मी तुला जरा वेळाने फोन करतो!"
असा आमचा आणि बिपिनशेठचा संवाद झाला.
थोड्या वेळाने आमचं त्या अशिलाकडचं काम संपलं आणि तिथून आम्ही दुसर्या एका कामकरता एका बँकेत रवाना झालो.
जरा वेळाने पुन्ना (च्यामारी, मा*** त्या शुदलेखनाच्या!) आमचा भ्र ध्वनी किरकिरला.
"संहिता जोशी कॉलिंग...." असा निरोप भ्र ध्वनीच्या फलकावर दिसत होता.
"संहिता जोशी? म्हणजे मिपाची यमी आज्जी? अरे हिचं आपल्याकडे आत्ता काय काम बरं!?" - स्वगत.
"नमस्कार करतो यमी आज्जी! कश्या आहात?" :)
"हम्म! मी सगळ्यांची आज्जी नाहीये कै, मी फक्त टारगट टाळूबाळाचीच आज्जी आहे!" यमीने खुलासा केला! :)
बिपिनशेठ यमीला भेटले होते आणि ते दोघेही आता मला भेटायला बँकेत यायला निगाले होते. (निगणे हे क्रियापद आम्ही 'बिलानशी नागिन निगाली' या एका फक्कड गाण्यातून शिकलो आहोत. मस्त शब्द आहे! च्यामारी, मा*** त्या प्रमाणभाषेच्या!)
थोड्याच वेळात मिपाचे बिपिन आणि यमी हे आमचे स्न्हेही आम्हाला ब्यँकेत येऊन भेटले. हाय-हॅलो, इकुडच्या तिकुडच्या गफ्फा झाल्या. बिपिनशेठ सध्या काही कामाकरता आमच्या म्हम्मईला आले आहेत आणि हापिसला चक्क दांडी मारून यमीचाही मुक्काम सध्या ठाण्यात आहे.
आता काय करायचं, काय करायचं, कुठे टिपी करावा अशी आम्हा तिघांत चर्चा सुरू झाली. यमीला आणि बिपिनला वाटलं की तात्या अंमळ कल्पक आहेत, ते काहितरी छान टूम सुचवतील!
छ्या! पण जल्ला (शब्दसौजन्य : मिपाचा आगरी रामायणकार ब्रिटिश!) मी कुठला कल्पक! आमच्या कल्पकतेची उडी फार फार तर मिपा खाण्यापर्यंत! :)
म्हटलं,
"चला रे मुलांनो! मामलेदारची मिसळ खायला जाऊ!"
हे ऐकून यमी आणि तिचा नातू बिपिन (हो, टारूबाळा व्यतिरिक्त यमीने आता बिपिनलाही नातू करून घेतल्याचं आजच मला कळलं!) दोघेही खुश झाले आणि आम्ही खुशी खुशी मिसळ खायला मामलेदाराच्या हाटेलापाशी पोहोचलो. यमीआज्जीने आधीच काहितरी खादाडी केली असल्यामुळे तिनं मिसळ न खाता फकस्त ताक प्यायलं. तिघांणीही मस्तपैकी गफ्फा मारता मारता मिसळीची खादाडी केली आणि आणि एक झकास मिपाकट्टा ठाण्यात अचानक जुळून आला. नंतर बिपिनशेठनी त्यांच्या लै भारी अश्या वातानुकुलीत गाडीतनं आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडलं! यमीलाही तिच्या घरी सोडून त्याला परत पुण्याला काही कामानिमित्त जायचं होतं.
आम्ही बिपिनरावांच्या गाडीतनं आमच्या घरापाशी उतरलो आणि यमीआज्जीला आणि बिपिनला आम्ही टाटा, बाय-बाय केलं. जाताना आम्हाला बिपिनशेठनी खाऊ म्हणून एक छानसं चाकलेटचं पाकिट सप्रेम भेट दिलं! :)
अहो देणारच सप्रेम भेट! अर्रे मग! साला, तात्या अभ्यंकर म्हणजे साधीसुधी आसामी वाटली क्काय तुम्हाला?! :)
आपला,
(मिपाचा ठाणे कट्टाकरी) तात्या.
१) मिसळपाव! "दर्शनमात्रे मन कामनापूर्ती!" (अलिकडे जुन्या आरत्यांच्या चालींच्या अनुषंगाने येणार्या शब्दयोजनेबद्दल किंवा शब्दयोजनेनुसार बांधलेल्या चालींबद्दल काही शब्दप्रभू-संगीतज्ञांचे मत अंमळ चांगले नाही असे ऐकतो!) :)
२) बिपिन कार्यकर्ते! मिपावरचा एक भला मनुक्ष. मिसळपाव चापण्यात मग्न आहे!:)
३) यमी आज्जी आणि बिपिन. बिपिनच्या हातातला पाव आणि यमीच्या हातातील ताकाचा गिल्लास असं दोघांचं जगावेगळं 'चिअर्स' चाललं आहे! :)
४) ....... आणि मराठी आंतरजालावरचं एक अत्यंत हलकट अन् भिका**ट व्यक्तिमत्व! मिसळपावचा घास घेऊन धन्य झालं आहे!:)
५) आणि बिपिनरावांनी आम्हाला खाऊ म्हणून दिल्लेलं हे चाकलेट बरं का मंडळी! आता हा लेख इथेच थांबवतो आणि त्या चाकलेटाचा समाचार घेतो! :)
कळावे,
आपला,
तात्या.
२) बिपिन कार्यकर्ते! मिपावरचा एक भला मनुक्ष. मिसळपाव चापण्यात मग्न आहे!:)
३) यमी आज्जी आणि बिपिन. बिपिनच्या हातातला पाव आणि यमीच्या हातातील ताकाचा गिल्लास असं दोघांचं जगावेगळं 'चिअर्स' चाललं आहे! :)
४) ....... आणि मराठी आंतरजालावरचं एक अत्यंत हलकट अन् भिका**ट व्यक्तिमत्व! मिसळपावचा घास घेऊन धन्य झालं आहे!:)
५) आणि बिपिनरावांनी आम्हाला खाऊ म्हणून दिल्लेलं हे चाकलेट बरं का मंडळी! आता हा लेख इथेच थांबवतो आणि त्या चाकलेटाचा समाचार घेतो! :)
कळावे,
आपला,
तात्या.
वाचन
20122
प्रतिक्रिया
0