(माउस)
ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..!
झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..!
मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला,
मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..!
कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला.
रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..!
अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा
मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..!
नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा,
कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..!
घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी.
भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..!
प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा पाउस. काही ठिकाणी जमिनीवरचे खड्डे बुजवण्याचे काम केले आहे.
वाचन
5785
प्रतिक्रिया
0