मिपाचे धोरण..
लेखनप्रकार
राम राम,
मिसळपाव ह्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! :)
आपल्याला कोणतीही अडचण आल्यास ती कृपया या पत्त्यावर लिहून कळवावी. अडचण कळवण्यापूर्वी कृपया हे एकदा वाचून पाहावे.
येथे लेखन करण्यापूर्वी मिसळपावचे (मिपाचे) खालील धोरण ध्यानात घ्यावे व सहकार्य करावे, ही नम्र विनंती..
- लिहिणार्या प्रत्येक माणसाबद्दल व त्याच्या लेखनाबद्दल मिपाला अत्यंत आदर आहे परंतु मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे.
- एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही.
- इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिपाकरांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर एखाद्याला/एखादीला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा...
- जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही....
- मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांना त्यांनी स्वत:नी केलेले लेखन प्रसिद्ध करण्याकरता बनवले गेलेले संस्थळ आहे, याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे ही विनंती...
वाचन
137040
प्रतिक्रिया
0