मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमची बी एक

मुक्तसुनीत · · जे न देखे रवी...
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!" कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर घेउनी मग दीर्घ पेंगा, घेतील कुठली गोळीही शमवुनि कंडा जरा देतील त्यावर जांभई वेदना अन घोरण्याची, मोज लांबी कानभर! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कवी : श्रीयुत ले.की. बोले

वाचन 8456 प्रतिक्रिया 0